Wednesday 13 December 2017

मिळकतींप्रमाणे फ्लेक्‍सलाही कर आकारणीचे आदेश

पिंपरी – शहरात बेकायदेशीर फ्लेक्‍सचा मुद्दा गंभीर बनला असताना एकाही फ्लेक्‍सवर आकाश चिन्ह परवाना विभागाकडून आजपर्यंत कारवाई केली नसल्याचे निदर्शनास येताच आयुक्‍त श्रावण हर्डीकर संतापले आहेत. फ्लेक्‍स किती दिवस लावला जाणार याच्या नोंदी घ्या, बेकायदेशीर फ्लेक्‍सवर नियंत्रण ठेवा तसेच फ्लेक्‍सला मिळकत कराप्रमाणे कर लागू करा, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी परवाना विभागाचे सहायक आयुक्त योगेश कडुसकर यांना दिले आहेत.

No comments:

Post a Comment