Wednesday 13 December 2017

पवना नदी पात्रातील जलपर्णी मुक्‍तीचा महापालिकेचा निर्धार; ठेकेदारांऐवजी मजूर लावून कामे करणार?

पिंपरी, (nirbhidsatta.com) – पवना नदी स्वच्छतेसाठी आता महापालिकेने पुढाकार घेतला आहे. दरवर्षी नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी ठेकेदारांवर सुमारे 15 लाख रुपये खर्च करण्यात येतो. तरीही पवना नदी अद्याप जलपर्णी मुक्‍त झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी जलपर्णी काढण्याकरिता ठेकेदारांवर खर्च करण्याऐवजी शहरातील 40 जणांच्या मजूर टीमकडून पवना नदीतील जलपर्णी काढण्यात यावी, अशी मागणी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली. त्यानूसार आयुक्‍तांनी जलपर्णी काढण्याबाबत ठेकेदारांकडील सध्यस्थिती जाणून घेवून त्यानंतर संबंधित व्यक्‍तींना मजूरी देण्यासह त्यांच्याकडून जलपर्णी काढण्यावर निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे.

No comments:

Post a Comment