Thursday 8 February 2018

पिंपळे निलखमध्ये चौंधे पाटील स्पोर्टसच्या वतीने सोसायटी स्पोर्टस मिटचे आयोजन

चौफेर न्यूज –  पिंपळे निलख येथील चौंधे पाटील स्पोर्टसच्या वतीने तिस-या वार्षिक इंटर सोसायटी स्पोर्टस मिटचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन रविवारी (दि. 11 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजता महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका आरती चौंधे, ममता गायकवाड, नगरसेवक संदिप कस्पटे, तुषार कामठे, पीसीएमटीचे माजी चेअरमन सुरेश चौंधे आदी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती संचालक संकेत चौंधे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

No comments:

Post a Comment