Thursday 8 February 2018

पुरंदर विमानतळाला रिंगरोडची कनेक्‍टिव्हीटी

पुणे : पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नुकतीच संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे. विमानतळावर जाण्यासाठी रोडची कनेक्‍टिव्हीटी देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील रिंगरोड हा आंबेगाव खुर्द-उरुळी-वडाची वाडी-वाघोली हा मार्ग विमानतळाच्या काही किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाने पुरंदर विमानतळाकडे जाण्यासाठीचा 18 किमी लांबीचा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विमानतळाकडे जाण्यासाठीचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

No comments:

Post a Comment