Thursday 8 February 2018

स्थायी समितीची “लक्ष्मण’रेषा!

11 सदस्यांचे राजीनामे : महापालिकेचा “रिमोट’ जगतापांकडेच
– अधिक दिवे 
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची “तिजोरी’ असलेल्या स्थायी समितीवरील कार्यकाळासाठी “लक्ष्मण’रेषा आखली असून, बुधवारी झालेल्या “लकी ड्रॉ’ पूर्वी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजप व सहयोगी अशा सर्व 11 सदस्यांचे राजीनामे घेण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे “ड्रॉ’मधून बाहेर पडलेल्या सहा सदस्यांसह अन्य पाचही सदस्यांना “स्वेच्छा निवृत्ती’ घ्यावी लागणार आहे, अशी माहिती महापालिकेतील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

No comments:

Post a Comment