Saturday 21 April 2018

पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांची आता सांस्कृतिक क्षेत्रातही घौडदौड

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकृर्डीतील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही यशस्वी घौडदौड सुरु आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने 19 वी राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात संपन्न झाली. यामध्ये राम गणेश गडकरी एकांकिका स्पर्धा करंडक मध्ये पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘एंट्री एक्झिट’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला आणि उत्कृष्ट अभिनय व दिग्दर्शक अथर्व ठाकरे, उत्कृष्ट संगीत विभाग व्दितीय क्रमांक वेदांत सेलमोकर, श्रध्दा टिल्लू, उत्कृष्ट नेपथ्य सुयश साळवेकर, अभिषेक बिल्दीकर यांनी चार वैयक्तिक बक्षिसे मिळवून पीसीसीओईचे नावात मानाचा तुरा रोवला.

No comments:

Post a Comment