Thursday 21 June 2018

महापालिकेने केले पुरनियंत्रण रेषा कायद्याचे उल्लंघन?

पिंपरीतील संजयनगर झोपडपट्टी शेजारील नदी पात्रात होतेय मैलाशुध्दीकरण केंद्र
रिपब्लिकन युवा मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार
पिंपरी-चिंचवड : पिंपरीतील संजयनगर झोपडपट्टी शेजारील पवना नदीच्या पात्रात महापालिकेच्या ड्रेनेज विभागाकडून मैलाशुध्दीकरण प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. याविषयी महापालिकेच्या अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांनी जिल्हाधिका-याकडून कोणतीही परवानगी न घेता मैलाशुध्दीकरण प्रकल्पाचे बांधकाम करीत पुरनियंत्रण रेषेचे उल्लंघन करुन पर्यावरणाची हानी केली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करुन मैलाशुध्दीकरणाचे बांधकाम थांबवावे, अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment