Thursday 21 June 2018

इसिएतर्फे पिंपरी-चिंचवड शहरात ई कचरा संकलन

मोशी परिसरात राबविला उपक्रम
पिंपरी : एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनतर्फे पिंपरी-चिंचवड शहरात ई कचरा संकलन उपक्रम सुरू आहे. प्रत्येक रविवारी नागरिकांच्या सहमतीने त्यांच्या परिसरात इ कचरा संकलन केले जात आहे. नुकताच असा प्रयत्न मोशी, वाकड आणि पिंपळे सौदागर परिसरात यशस्वीपणे पार पडला. नागरिकांनी आपल्या घरातील अथवा कार्यालयातील ई कचरा इसिएच्या स्वाधीन केला, असे इसिएचे संचालक विकास पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment