Thursday 21 June 2018

अधिकाऱ्यांकडून आयुक्‍तांच्या आदेशाला कोलदांडा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार सध्या कायद्यानुसार नसून, प्रथा परंपरेनुसार सुरु असल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या बीआरटीएस विभागातील कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांची अन्य विभागात बदली होऊनही, त्यांनी ही बदली रद्द करण्याची किमया दाखविली. त्यामुळे या परपरांना आणखी बळ मिळाले आहे. दस्तुरखुद्द आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रथा-परंपरेचे पालन केल्याचे यावरुन दिसून आले आहे.

No comments:

Post a Comment