Wednesday 18 July 2018

‘सेल्फी विथ खड्डा, फोटो पाठवा १०० रुपये मिळवा’; राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून सत्ताधारी भाजप शहरवासियांच्या जीविताशी खेळत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने ‘सेल्फी विथ खड्डा’ हा उपक्रम सुरु केला आहे. शहरातील रस्त्यावरील खड्ड्याचे फोटो  विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या ९८२२१९९५९९ आणि युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांच्या ९९७००३७५१३ या व्हॉटसअॅपवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फोटो पाठविणा-याला प्रत्येक खड्यांनिहाय १०० रुपये दिले जाणार आहेत. 

No comments:

Post a Comment