Wednesday 18 July 2018

व्यावसायिक वाहनांना ट्रॅकिंग यंत्रणा बंधनकारक होणार

नवी दिल्ली: केंद्रीय मोटार वाहन नियमातल्या सुधारणांचा मसुदा, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केला आहे. यामध्ये राष्ट्रीय परवानाधारक सर्व व्यावसायिक वाहनांना फास्टॅग आणि वाहन ट्रॅकिंग यंत्रणा उपकरण अनिवार्य करण्याचा समावेश आहे. वाहनाच्या पुढच्या काचेवर फास्टॅग लावावा लागेल. त्याचबरोबर राष्ट्रीय परवानाधारकांना वाहनाच्या पुढे ठळक अक्षरात नॅशनल परमीट किंवा एन/पी असे दर्शवावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment