Tuesday 31 July 2018

दंडाबाबत फेरविचार करू

पिंपरी – पिंपरी-चिंचवड मनपा स्थायी समितीने हातगाडी, टपरी धारकाकडून सुमारे 6400, 12800, व 38400 रु अतिक्रमण शुल्क, प्रशासकीय शुल्क आकारण्याचा ठराव केला आहे, हा अन्यायकरक असून तो रद्द करावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र फेरीवाला क्रान्ती महासंघाने आमदार महेश लांडगे, आझम पानसरे, पक्षनेते एकनाथ पवार यांना निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, समन्वयक इरफान चौधरी, कासिम तांबोळी, रामा बिरादार, संचित तिखे, अम्बालाल सुखवाल, हरी भोई, बाळासाहेब सोनवणे, पप्पू तेली, देवीलाला अहीर आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड मनपा कडून फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई सुरू असून यात परवाना धारक विक्रेत्यांवर देखील कारवाई सुरू आहे, यात त्यांचे साहित्य जप्त केले जात आहे. हॉकर्स झोन न करता मनपा दडपशाही करत आहे. ते बंद करावे आदी मागण्या आज मनपा आयुक्‍त श्रावण हार्डीकर यांना भेटून चर्चा केली .

No comments:

Post a Comment