Tuesday 31 July 2018

रेडिरेकनर वास्तवदर्शी हवे!

पुणे – रेडिरेकनर अर्थात वार्षिक मूल्य दर दरवर्षी 1 एप्रिलला जाहीर होतात. हे दर जाहीर होताच विविध संस्था तसेच नागरिकांकडून रेडिरेकनरमध्ये केलेली वाढ रद्द करण्याची मागणी होते. बाजारात असलेला दर आणि रेडिरेकनरचा दर यामध्ये तफावत असून, रेडिरेकनरचा दर जास्त असल्याचा आरोप होतो. आता हे नवे दर जाहीर होण्यास 7 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. साधारपणे हे दर निश्‍चित करण्याचे काम डिसेंबरपासून सुरू होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर दरवर्षी उद्‌भवणारी ही परिस्थिती आता बदलण्याची गरज असून, राज्यातील जमीन, सदनिका आणि दुकाने यांचे बाजारमूल्य अधिक वास्तववादी आणि अचूक करण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी शासनाने आत्तापासूनच ही तयारी करण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment