Wednesday 19 December 2018

पिंपळे सौदागरमध्ये पाण्यासाठी आयुक्तांना घेराव

पिंपळे सौदागर ः शहरात पाण्याची समस्या बिकट असताना महापालिका आयुक्त विकासाच्या बाता करीत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांना संतापून स्मार्ट सिटीचे राहू द्या. पिण्याच्या पाण्याचे काय ते सांगा, असा सवाल आयुक्त हर्डिकर यांना केला. स्मार्ट सिटीचा हेतू, विकासकामांचे नियोजन, भविष्यात होणारे शहरातील बदल आदी विविध मुद्दयांवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रविवारी सुमारे अडीच तास नागरिकांशी संवाद साधला. पिंपळे सौदागर येथील नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनच्या वतीने स्मार्ट सिटीचे सादरीकरण व आयुक्तांशी संवाद या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार लक्ष्मण जगताप होते. सहशहर अभियंता राजन पाटील, संगणक विभागाचे प्रमुख नीलकंठ पोमण, नगरसेवक शत्रुघ्न काटे, निर्मला कुटे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment