Thursday 21 September 2017

पोवाड्यातून स्त्री शक्तीचा जागर अन्‌ समाज प्रबोधन

शाहीर शीतल कापशीकर : आधुनिकतेची कास धरून स्वरचित पोवाडे
पिंपरी – “पुराण काळापासून । नारी रूपाला । करिती वंदन । गार्गी, मैत्रेयी उदाहरण । विदुषी होत्या बुद्धिमान । तशाच थोर पंचकन्या । अहिल्या, द्रौपदी नि सीता । तारा नि मंदोदरी तथा । करूया नित्य त्यांचे स्मरण हो जी जी जी…. ।’ कष्टानेच कलेचीही सिद्धी प्राप्त होते. विविध कलागुण असणारे अनेक जण असतात मात्र पोवाड्याची पारंपारिक लोककला जोपासून काहीतरी वेगळं करण्याची जिद्द उराशी बाळगून पोवाड्यातून समाज प्रबोधन, आधुनिकतेची कास धरून, स्त्री शक्तीचा जागर निर्माण करण्याचे काम शाहीर शीतल कापशीकर यांनी गेली दहा वर्ष केले आहे.

No comments:

Post a Comment