Thursday 21 September 2017

'सारथी'ची पिळवणूक

सारथी संदर्भात आजच्या सकाळमध्ये आलेली बातमी खरंच धक्कादायक आहे! आमच्या माहितीनुसार हे सर्व ऑपरेटर पदवीधारक आहेत, त्यांचे इंग्रजी, मराठी, हिंदी तिन्ही भाषेवर प्रभुत्व आहे आणि पिंपरी चिंचवड पालिकेच्या सर्व यंत्रणा व विभागांबद्दल ते उत्तम प्रशिक्षित आहेत. पालिकेसाठी व शहरासाठी ते महत्वपूर्ण आहे, ते चांगले काम करत आहेत आणि नक्कीच सारथीच्या यशामध्ये त्यांचाही वाटा आहे. तत्कालीन आयुक्त डॉ श्रीकर परदेशी यांनी ऑपरेटर भरती व प्रशिक्षण यासाठी एक आदर्श व्यवस्था आखून दिली होती परंतु त्यांच्या बदलीनंतर आयटी विभागप्रमुखांनी या सर्व चांगल्या व्यवस्थांना केराची टोपली दाखवली असे दिसते कारण सारथी प्रकल्पाच्या सुरवातीस हे सर्व ऑपरेटर पालिकेच्या थेट वेतनावर होते पण नंतर त्यांना खाजगी कंपनीच्या दावणीला बांधले गेले

No comments:

Post a Comment