Thursday, 3 May 2018

पिंपरीगावातील अनधिकृत इमारतीवर धोकादायक टॉवर; कारवाईची मागणी

पिंपरी (Pclive7.com):-  पिंपरीगावातील पॉवर हाऊस चौकात एका अनधिकृत इमारतीवर विनापरवाना धोकादायक टॉवर उभारण्यात आला आहे. हा टॉवर उभारतेवेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनला तक्रार करून देखील प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या टॉवरमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार असून यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली.

No comments:

Post a Comment