Sunday 29 July 2018

पालिकेच्या हॉलची मागणी

पिंपरी-चिंचवडची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना शहराची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी पालिकेच्या वतीने सद्यस्थितीत एकही हॉल अथवा नाट्यगृह उपलब्ध नाही. त्यामुळे पालिकेच्या वतीने हॉल उपलब्ध करून देण्याची मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील हॉल सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश आयुक्तांनी तातडीने द्यावेत, अशी मागणी मानव कांबळे, दिलीप काकडे, प्रदीप पवार, उमेश इनामदार, गिरिधारी लढ्ढा, प्रताप लोके, अशोक मोहिते आदींनी केली आहे.

No comments:

Post a Comment