Tuesday 4 December 2018

“59 मिनिटात एक कोटी’ फसवेगिरी?

पिंपरी – अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 59 मिनिटात एक कोटीपर्यंतचे कर्ज ही सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसाठी योजना आणली आहे. या योजनेबाबत उद्योजकांमध्ये प्रचंड उत्साह होता. परंतु 59 मिनिटांमध्ये कर्ज मंजूरी होत असून “इन प्रिंसिपल ऍप्रूव्हल’ होत आहे. नियमित कर्जासाठी जी प्रक्रिया करावी लागते, तीच प्रक्रिया आणि तेवढाच वेळ या योजनेतंर्गतही लागत असल्याने ही योजना एक प्रकारची फसवेगिरी असून एका खासगी कंपनीचे भले करण्यासाठी ही योजना राबवली असल्याचा गंभीर आरोप पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस ऍण्ड ऍग्रीकल्चर या औद्योगिक संघटनेकडून करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment