Tuesday 4 December 2018

महापालिका खर्चातून महापौरांना महागडा “टॅब’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून अनेक वारेमाप खर्चांना फाटा देऊन काटकसर व बचतीचे धोरण राबविले जात असतानाच, महापौर राहुल जाधव यांनी स्वत:च्या वापरासाठी चक्क पालिकेच्या खर्चातून “टॅब’ विकत घेतला आहे. तब्बल 74 हजार रूपयांचा हा महागडा टॅब आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपचे काटकसर व बचतीचे धोरण निव्वळ दिखाव्यापुरते असल्याची टीका होऊ लागली आहे.

No comments:

Post a Comment