Tuesday 4 December 2018

रिव्हर सायक्लोथॉनमध्ये ७ हजारांहून अधिक पर्यावरण प्रेमींचा सहभाग

चौफेर न्यूज –  इंद्रायणी स्वच्छता अभियान रिव्हर सायक्लोथॉन पुरतेच मर्यादित न राहता ‘एक पाऊल भावी पिढीसाठी-इंद्रायणीच्या रक्षणासाठी’ पुढे कायमस्वरुपी सुरु ठेवण्याचे नियोजन आहे. यामध्ये विविध, संस्था, संघटनांना सहभागी करुन घेण्यात येईल. या अभियानाच्या माध्यमातून वृक्षारोपण व संवर्धन करणे, पाणी आडवा-पाणी जिरवा, पशू, पक्षी यांचे संवर्धन करणे, पक्षालय सुरु करणे, उत्सव काळात निर्माल्य व मुर्ती नदीत टाकू नये यासाठी समाज प्रबोधन करणे, आठवड्यातून एक दिवस कोणतेही वाहन न वापरता फक्त सायकलने प्रवास करणे, आठवड्यातून एक दिवस इंद्रायणी नदी परिसरात श्रमदान करणे असे विविध पर्यावरण पुरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत यामध्ये नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले.

No comments:

Post a Comment