Saturday 12 January 2019

अबब… ७० टक्के आरक्षित जागाही पिंपरी चिंचवड मनपाच्या ताब्यात नाही

पिंपरी चिंचवड : घर बचाव संघर्ष समिती गेल्या ५७५ दिवसांपासून हक्कांच्या घरांसाठी आंदोलन करीत आहे.त्या नुसार अनेक वेळा पत्रव्यवहारही पालिकेला केला आहे.आरक्षित जमिनीबाबत मोठी तफावत असल्याकारनाने त्याचप्रमाणे महापालिका हद्दीतील मोठ्या आरक्षित जागेंवर आता घरेही गेल्या २५ वर्षात उभी राहिल्यामुळे शहराचा डी पी अद्यावत करावा ह्याकरता समिती महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. त्यानुसार सदरच्या पत्रामुळे मोठी बाब उघड झाली असून ११६७.७८ हेक्टर जमिनीपैकी फक्त ३९५.३९ हेक्टर जमीन क्षेत्र आता मनपाच्या ताब्यात आहे. उर्वरित ७७२.४० हेक्टर जमीन क्षेत्र हे मनपाच्या ताब्यात नाही.

No comments:

Post a Comment