Thursday 13 September 2012

सोलापुरातील टोळीला चिंचवडमध्ये अटक

सोलापुरातील टोळीला चिंचवडमध्ये अटक: पिंपरी । दि. ११ (प्रतिनिधी)

चिंचवड येथील अमित ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी मोटारीतून हत्यारे घेऊन चाललेल्या सोलापुरातील टोळीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून मोटारीसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास आहेरनगर येथील चिंतामणी चौकात ही कारवाई करण्यात आली. आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक जालिंदर तांदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन राजू माने, लखन अशोक कुलकर्णी, किरण आनंद धोडमिसे (तिघांचेही वय २१, रा. अनिलनगर वसाहत, पंढरपूर, जि. सोलापूर), अनिल पुंडलिक घाडगे (२0), प्रवीण देविदास शिंदे (२२, रा. डोंबे गल्ली, पंढरपूर, जि. सोलापूर), लक्ष्मण शिवाजी आकळे (२३, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर), सिद्धनाथ हरिभाऊ कडलस्कर (२३, रा. कडबे गल्ली, पंढरपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार प्रीतम दिलीप रायचुरकर (रा. डांबे गल्ली, पंढरपूर) हा पसार झाला आहे. ते दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार क्रुझर मोटारीमधून (एमएच १३ एझेड ३0८२) चाललेल्या तरुणांची हालचाल संशयास्पद वाटली. म्हणून पोलिसांनी त्यांना हटकले. त्यांच्या मोटारीची तपासणी केली असता त्यात सुरा, नायलॉन दोरी, मिरची पावडर, लोखंडी गज, पाईप, कटावणी अशी घातक हत्यारे आढळली. मोटारीसह ८ लाख २९ हजार ८३५ रुपयांचा

मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर कर्नाटक, महाराष्ट्रात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बेळगावात घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment