Monday 12 November 2012

रुग्णालयांसाठी नेमणूक केलेले सुरक्षारक्षक उद्यान, कचरा डेपोत !

रुग्णालयांसाठी नेमणूक केलेले सुरक्षारक्षक उद्यान, कचरा डेपोत !
पिंपरी, 9 नोव्हेंबर
नवजात अर्भकांची चोरी रोखण्यासाठी महापालिकेने वर्षभरापूर्वी नेमलेले 20 सुरक्षारक्षक रुग्णालयांऐवजी उद्यान, कचराडेपो आणि गोडाऊनची निगराणी करत असल्याची धक्कादायक बाब शिवसेना नगरसेविका सीमा सावळे यांनी उघडकीस आणली आहे. नवजात अर्भकांच्या चोरीला आळा बसावा म्हणून उच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची महापालिकेकडून पायमल्ली होत असल्याचा आरोपही सीमा सावळे यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment