Thursday 1 June 2017

जिल्हा रुग्णालयात महिला प्रतिक्षालयाची मागणी

पिंपरी,  (प्रतिनिधी) – नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात महिला प्रतिक्षालय सुरू करण्याची मागणी नगरसेवक तुषार कामठे यांनी केली. जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. सध्याचे प्रतिक्षालय आहे; मात्र ते बंद अवस्थेत असल्याने महिलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्वरीत ते प्रतिक्षालय सुरू करण्याची मागणी कामठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment