Thursday 1 June 2017

महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पिंपरी, (प्रतिनिधी) – अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 मध्ये रावेत-वाल्हेकरवाडी येथील अनधिकृत बांधकामावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली.
या कारवाईमध्ये 1 आर.सी.सी., 1 विट बांधकाम, 7 पत्राशेड अशा एकुण 9 बांधकामांवर कारवाई करण्यात आली. 10 हजार 447 चौरस फूट ही बांधकामे होती. कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता केशवकुमार फुटाणे तसेच कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली. महापालिकेचे 7 पोलीस कर्मचारी, 10 मजूर व 10 महापालिका कर्मचारी तसेच 2 ट्रॅक्‍टर, 2 जे.सी.बी. च्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.

No comments:

Post a Comment