Thursday 1 June 2017

असंघटित कामगारांचा पिंपरीत शनिवारी मेळावा

पिंपरी,  (प्रतिनिधी) – कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या असंघटित कामगारांचा मेळावा आयोजित केला आहे. संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात शनिवारी (दि.3) हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात कष्टकऱ्यांना श्रम प्रतिष्ठा पुरस्कार, मोफत विमा व पेन्शन कार्डाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांनी दिली.

No comments:

Post a Comment