Monday 4 December 2017

…तरच पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो!

पिंपरी – शहरातील नागरिकांनी पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो मार्गिका न्यावी, या मागणीबाबत महामेट्रो सकारात्मक आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने पिंपरी ते निगडीपर्यंतचा “डीपीआर’ बनविण्याची मागणी केली आहे. मेट्रोचा खर्च केंद्र व राज्य सरकार 50-50 टक्के करीत आहे. उर्वरीत मेट्रोसाठी त्यांची आवश्‍यक ती परवानगी मिळणे गरजेचे आहे. परंतु, पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठी महापालिका खर्च करणार असेल, तर निश्‍चितच विचार करण्यात येईल, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

No comments:

Post a Comment