Monday 4 December 2017

थांब्यावरही थांबत नाही बस

पिंपरी – मुंबई-पुणे महामार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समोरील मोरवाडी चौकात बस थांबा आहे. मात्र, या बस थांब्यावर बहुतेक बसेस थांबत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या (पीएमपीएमएल) निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसत आहे. यामध्ये सुधारणा घडवून महामंडळाने येथील थांब्यावर बस थांबवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment