Monday 4 December 2017

प्राध्यापकांसाठी कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन

ताथवडे – जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ताथवडे येथील राजर्षी शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने ए. आय. सी. टी. ई. च्या सहकार्याने प्राध्यापक कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
रिसेंन्ट ट्रेंडस इन इंटरनेट ऑफ थिंग्ज या विषयावर ही कार्यशाळा होईल. 4 ते 15 डिसेंबर 2017 या कालावधीत होणाऱ्या या कार्यशाळेत आय. ओ. टी. सोल्युशन पर्सिस्टंट सिस्टिम्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. आर. के. व्यंकटेश्वरन हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जेएसपीएमचे संस्थापक सचिव डॉ. टी. जे. सावंत, संचालक डॉ. रवी जोशी, अनिल भोसले, डॉ. एम. डी. टकले असणार आहेत.

No comments:

Post a Comment