Wednesday 10 October 2018

घंटागाडी कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीसाठी 20 हजार रुपये बक्षिस रक्कम दिली जाणार शाहे. ऐनवेळी मांडलेल्या प्रस्तावाला स्थायीने मान्यता दिली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या रकमेत पाच हजारांची वाढ करण्यात आली आहे. स्थायी समितीने या खर्चाच्या ऐनवेळच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
पिंपरी-चिंचवड पालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना गेल्यावर्षी 15हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. या रकमेत यंदा वाढ करण्याची या कर्मचाऱ्यांची मागण हिोती. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यात पाच हजाराने वाढ देण्यात आली आहे. गेल्या वर्षी 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान होते. घंटागाडी कर्मचाऱ्यांना यामुळे यंदा 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

No comments:

Post a Comment