Wednesday 10 October 2018

स्मार्ट सिटीतील कचरा कुंड्या ‘ओव्हर फ्लो

पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणार्‍या पिंपरी-चिंचवड शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शहरात सर्वत्र कचरा कुंड्या ‘ओव्हर फ्लो’ झाल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून सत्ताधारी आणि प्रशासनाने त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. स्वच्छ भारत अभियानात शहराचा कचरा झाल्यानंतर देखील कच-या सारख्या गहन प्रश्‍नाकडे प्रशासन आणि सत्ताधारी गांभीर्याने पाहत नसल्याने शहरवासियांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment