Wednesday 10 October 2018

सिंगिग सुपरस्टार स्पर्धेत मयुरी अत्रे प्रथम

आकुर्डी : रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्यावतीने रोटरी सिंगिंग सुपरस्टार स्पर्धा घेण्यात आली. सिंगिंग सुपरस्टार स्पर्धेत मयुरी अत्रे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेस उत्स्फूर्त सहभाग लाभला. आकुर्डी येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत 78 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी 30 स्पर्धकांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यात 8 स्पर्धकानी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अलबेला सजन आयो रे, ढोलकीच्या तालावर, दिल से रे, बहुत प्यार करते है तुमको सनम, मैं फिर भी तुमको छाऊंगा या अशा अनेक गाण्यांनी स्पर्धेत रंगत आणली. स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली. परीक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment