Friday 15 December 2017

सावित्रीबाई फुले वाचनालयाच्या उद्‌घाटनाला मुहूर्त

पिंपरी – स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि वाचनप्रेमींची अध्ययनाची भूक भागविण्यासाठी स्व. सावित्रीबाई फुले वाचनालयाची वास्तू उभारण्यात आली. मात्र, या इमारतीत शिक्षण मंडळ, परवाना विभाग, आरोग्य विभाग, कायदा विभागाचा प्रशासकीय कारभार सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असल्याने महापौर नितीन काळजे यांनी आज गुरूवारी (दि. 14) बैठक घेतली. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनादिवशी (दि. 3 जानेवारी) या वाचनालयाचे उद्‌घाटन करण्याचे त्यांनी जाहीर केले.

No comments:

Post a Comment