Friday 15 December 2017

शारीरिक शिक्षणाच्या तासाचा खेळखंडोबा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक व माध्यमिक विभागात सध्या विद्यार्थ्यांच्या खेळाचा तासच हरवून बसला आहे. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी खेळ हा घटक शासन स्तरावर प्राधान्याचा समजला जातो. खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक शक्‍कली लढवल्या जात असताना क्रीडा शिक्षकांअभावी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये खेळाचा तासच होत नसल्याने खेळाच्या तासांचा खेळ-खंडोबा झाला आहे.

No comments:

Post a Comment