Monday 3 July 2017

पी. के. इंटरनॅशनलमध्ये रंगला विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा

पिंपळे सौदागर – येथील व्हीएचबीपी पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून दिंडीत विठ्ठल-विठ्ठल व हरी नामाचा गजर करत डोक्‍यावर तुळशी घेऊन तसेच फुगड्या खेळून कार्यक्रमाचा आनंद लुटला. शाळेमध्ये पालखी निमित्त रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता. तर काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्‍मिणी बनून दिंडीची शोभा वाढवली. दिंडी सोहळ्यात शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे, मुख्याध्यापिका जुगुळकर, अनिता साने तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.

No comments:

Post a Comment