Monday 3 July 2017

पीएमपीची “जीपीएस’ यंत्रणा अल्पावधीतच “ब्रेकडाऊन’

त्रुटी काढण्यास अपयश: कोट्यवधींचा खर्च पाण्यात जाण्याची भीती
– नियंत्रण कक्षाचे अल्पावधीतच वाजले तीनतेरा
– सुविधा सुरू करूनही प्रवाशांनाही दिलासा नाही
पुणे – गेल्या काही वर्षांपासून आर्थिक भार सोसत अडखळत वाटचाल करणाऱ्या पीएमपी प्रशासनाने मालकीच्या आणि भाडेतत्वावरील प्रत्येक बसेसना “जीपीएस’ यंत्रणा बसविली. त्यासाठी प्रत्येक डेपोमध्ये कंट्रोल रुम सुरू करण्यात आली आहे. मात्र, या यंत्रणेतील प्रचंड त्रुटी काढण्यास प्रशासनाला अपयश आल्याने ही यंत्रणा अल्पावधीतच “ब्रेकडाऊन’ झाली आहे. या योजनेमुळे दिलासा मिळण्याऐवजी त्यांची डोकेदुखी वाढली आहे. परिणामी, त्यासाठी करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च “पाण्यात’ जाण्याची भीती आहे.

No comments:

Post a Comment