Friday, 31 August 2012

हिंदू जनजागृती समितीची निदर्शने

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32838&To=1
हिंदू जनजागृती समितीची निदर्शने
हिंदू जनजागृती समितीच्या संकेत स्थळावर बंदी आणल्याच्या निषेधार्थ समितीच्या पिंपरी-चिंचवड मधील कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 30) पिंपरी चौकात निदर्शने केली.

कोट्यावधींच्या जकात वसुलीसाठी महापालिकेकडून आणखी दोन मिळकती सील

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32835&To=6
कोट्यावधींच्या जकात वसुलीसाठी महापालिकेकडून आणखी दोन मिळकती सील
विक्रीकर कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे काळेवाडी येथील जमतानी सेल्स, साईसागर/साईदर्शन यांनी सुमारे 37 लाख रुपयांची जकात चुकविल्याचे उघड झाले आहे. जकात रक्कम आणि त्यावर दहापट तडजोड शुल्कापोटी सुमारे पावणेचार कोटी रुपयांच्या दंड वसुलीची नोटीस या दोन्ही व्यावसायिकांना बजाविण्यात आली. मात्र त्याच्या वसुलीची नोटीस बजावूनही त्याला दाद न दिल्याने महापालिकेने त्यांच्या मिळकती सील केल्या आहेत.

आकाशात शुक्रवारी उगविणार 'ब्ल्यू मून' !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32831&To=1
आकाशात शुक्रवारी उगविणार 'ब्ल्यू मून' !
एकाच इंग्रजी महिन्यात दोनदा पौर्णिमा आल्याने सुमारे अडीच वर्षानंतर उद्या (शुक्रवारी) आकाशात 'ब्लू मून' उगविणार आहे.

महापालिका आयुक्तांकडून अजित पवार यांची दिशाभूल

महापालिका आयुक्तांकडून अजित पवार यांची दिशाभूल: पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील गोरगरीब नागरिकांच्या घरांवर बुलडोझर फिरविला तर राष्ट्रवादीला भविष्यात जबर राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते, माजी महापौर आझम पानसरे यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिला.

विमानतळ भूसंपादनास होणार सुरवात

विमानतळ भूसंपादनास होणार सुरवात: पुणे - पुणे परिसरातील नवीन विमानतळ चाकणऐवजी राजगुरूनगरजवळ कोये-कडूस परिसरात उभारण्यावर अंतिमत: शिक्कामोर्तब झाले असून, त्यासाठी जमिनी संपादित करण्यास 200 कोटी रुपयांचा निधी देण्यास सरकारने सहमती दर्शविली आहे.

Pune civic body to purchase five ambulences

Pune civic body to purchase five ambulences: The medical department of Pimpri Chinchwad Municipal Corporation will purchase five ambulances at a cost of Rs 45.96 lakh to replenish its fleet.

जकात चुकवून आणलेला माल पकडला

जकात चुकवून आणलेला माल पकडला: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जकात विभागाच्या भरारी पथकाने मंगळवार (२८ ऑगस्ट) जकात न भरता शहरात आणलेले सात लाख ४४ हजार रुपयांचे चॉकलेट व खाद्यपदार्थ पकडले. या वस्तूंची जकात १८ हजार ५९८ रुपये होती. तर, दहापट दंडासह ही रक्कम दोन लाख चार हजार ५७८ रुपयांची झाली असून, संबंधित वितरकाला पालिकेने नोटीस पाठवली आहे.

चाकण विमानतळासाठी ६०० कोटी

चाकण विमानतळासाठी ६०० कोटी: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चाकण विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली असून, त्यासाठी राज्याच्या २०१२ -१३ च्या बजेटमध्ये सहाशे कोटींची तरतूद केली जाणार आहे.

आयुक्तांचा हॉस्पिटल पाहणी दौरा

आयुक्तांचा हॉस्पिटल पाहणी दौरा: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शहरातील प्रमुख हॉस्पिटलमध्ये जाऊन बुधवारी पाहणी दौरा केला. या पाहणीत आढळलेल्या गैरसोयी तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

हर्षवर्धन यांची शिष्टाई, नेवाळे ...

हर्षवर्धन यांची शिष्टाई, नेवाळे ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या स्वीकृत सदस्यपदासाठी नाटय़मय घडामोडीनंतर काँग्रेसकडून विष्णुपंत नेवाळे यांची वर्णी लागली. संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील यांची शिष्टाई नेवाळे यांच्या पथ्यावर पडली. मात्र, यानिमित्ताने पक्षातील खदखद कायम असल्याचे चित्रही पुढे आले आहे.
शिक्षण मंडळातील शासननियुक्त दोनपैकी एक जागा काँग्रेसच्या वाटणीला होती. त्यासाठी पक्षातील इच्छुकांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तीव्र रस्सीखेच होती. प्रत्येकाने आपापल्या ‘गॉडफादर’ला साकडे घालून ‘फिल्डींग’ लावली होती.
Read more...

Second campus of Pune court to be set up at Moshi

Second campus of Pune court to be set up at Moshi: The decision was taken on Tuesday in a meeting chaired by Chief Minister Prithviraj Chavan, Deputy Chief Minister Ajit Pawar, Chief justice of Bombay High Court Mohit Shah, registrar general of HC S B Shukre along with officials from the revenue and public works departments.

It is time for a smarter haircut soon, courtesy of the YCMOU

It is time for a smarter haircut soon, courtesy of the YCMOU: PUNE: Do not be surprised if you find your favourite saloon a more perfect place, and the barber there a more knowledgeable person with greater expertise during your future visits! In yet another first to its credit, the Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU) has now introduced a certificate and diploma course in saloon techniques exclusively for the barber community.
It is time for a smarter haircut soon, courtesy of the YCMOU

राज्य शासनाचा पत्रव्यवहार, आदेश महासभेच्या सभापटलावर येणार

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32823&To=5
राज्य शासनाचा पत्रव्यवहार, आदेश महासभेच्या सभापटलावर येणार
शासनाकडून आलेली पत्र, निर्णय, आदेशांचा महासभेच्या कामकाजात समावेश केला जात नसल्याची बाब शिवसेनेने उघडकीस आणून दिल्यानंतर महापालिका प्रशासनाला अखेर जाग आली. महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी तात्काळ आदेश जारी केले असून महापालिकेशी संबंधीत शासनाकडून प्राप्त होणारे आदेश, निर्णय यासंदर्भातील पत्रे महापालिका सभेच्या कार्यपत्रिकेवर ठेवण्यात यावीत तसेच ही पत्रे नगरसचिव कार्यालयाकडे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी सोपविण्यात यावीत, असे आदेश जारी केले आहेत.