Monday, 20 February 2017

उद्या मतदानाला जाण्याआधी इथे दिलेली माहिती नक्की पडताळा

तुम्ही तुमच्या प्रभागातून उभ्या असलेल्या उमेदवारांबद्दल कार्यअहवाल, प्रत्यक्ष भेटी यामधून माहिती घेतली असेलच. कोणीच उमेदवार योग्य वाटत नसल्यास NOTA पर्याय आहेच आणि जर एकापेक्षा अधिक उमेदवार योग्य वाटत असल्यास या अंतिम क्षणी संभ्रम दूर करण्यासाठी उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे जमा केलेले प्रतिज्ञापत्र (Affidavait) काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांबद्दल इत्यंभूत माहिती जसे शिक्षण, वैयक्तिक व कुटुंबाच्या नावावर असलेली संपत्ती, बँकेची देणी, गुन्हे दाखल असल्यास... अशी सर्व माहिती एका क्लिकवर पाहू शकतात. तुम्ही वाचा आणि इतरांनाही सांगा
लिंक - https://panchayatelection.maharashtra.gov.in/MasterSearch.aspx

मतदानाला जाताना हे न्या...


[Video] पिंपरी महापालिका निवडणूकीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. बंदोबस्ताठी एक पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, 24 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तीन हजार कर्मचारी अशी तगडी फौज तैनात असणार आहे. त्याचबरोबर राज्य राखीव दलाचे पोलिसही असणार आहेत, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.

Panel 9 (PCMC): Big panel, strong candidates up the challenge here


साडेदहा कोटी रुपयांचा घोटाळा

कलाटे, पोळ आणि पीरजादे यांच्यासह उपाध्यक्ष राजेंद्र नेटके, संचालक आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, संचालिका सुभांगी वानखेडे, संचालक रोहिदास मुरकुटे, संचालक आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक ...

PCMC Election 2017: शरद पवारांचीही जीभ घसरली, अपशब्द असणाऱ्या म्हणीचा भाषणात सूचक उल्लेख

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही पिंपरी चिंचवड येथील प्रचारसभेत बोलताना स्वत:वर आवर घालणे जमले नाही. बोलण्याच्या ओघात त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत एका ग्रामीण म्हणीचा पूर्वाध वापरत टोला लगावला. पवार यांच्या या ...