Thursday, 4 October 2018

सहप्रवाशांना आसनपट्टय़ाची सक्ती

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घडलेल्या गंभीर अपघातांची माहिती महामार्ग पोलिसांकडून संकलित करण्यात आली आहे.

पाच महिन्यांत रिचवली पाच कोटी लिटर दारू

पुणे - शहरासह जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत तब्बल चार कोटी ७२ लाख लिटर देशी-विदेशी दारूची विक्री झाली आहे. दारू पिणाऱ्यांच्या संख्येत आणि खपामध्ये वेगाने वाढ होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. 

सीमा भोसले यांना आदर्श शिक्षीका पुरस्कार

नवी सांगवी : शिक्षकदिनानिमित्त लांडगे नाट्यगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बालवाडी गटातून दुर्गा बाल विद्यामंदिरच्या सीमा   भोसले यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सीमा भोसले या 2008 पासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बालवाडीमध्ये शिक्षिका आहे. त्या सध्या चर्‍होली बुद्रुक येथे कार्यरत असून त्यांचे लहान मुलांसाठीचे कार्य गौरवास्पद आहे. 

पिंपरी चिंचवड शहरात लहान मुली होतायत ‘सॉफ्ट टार्गेट’

हिंजवडी येथील सामूहिक लैंगिक अत्याचार, अनैसर्गिक कृत्य आणि पीडित मुलीचा मृत्यू प्रकरण ताजे असताना पिंपरी येथे सात वर्षाच्या मुलीचे अपहरण करून खून, वर्ग शिक्षकाकडून अत्याचार याच बरोबर शहरात बाल लेंगिक अत्याचार सुरू असतानाच आज तर चक्क तडीपार गुंडाने चार वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी प्रकरणातील निष्काळजीपणा, विनयभंग झालेल्या तरुणीची तक्रार घेण्यास टाळाटाळ, आठ दिवस होऊनही त्या मुलीचा आरोपी मोकाट आणि पोलिसांच्या नाकावर ठिचून शहरात फिरणारे तडीपार गुंड आणि त्यांचे कारनामे यावरून शहरात कायदा सुव्यवस्था आहे का नाही?, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे का? आणि तपासी यंत्रणा बिनकामी झाल्या आहेत का? असे अनेक प्रश्न समोर उपस्थित होत आहेत. तर आयुक्तलयाच्या चालू वर्षात तब्बल ११९ बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत.

लायन्सने केली पोलिसांची आरोग्य तपासणी

पिंपरी : लायन्स क्लब ऑफ पुणे सफायरच्यावतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने पोलिसांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी महाशिबिरात 250 जणांची तपासणी करण्यात आली. चिंचवड येथील पिंपरी पोलीस ठाण्यात हा कार्यक्रम पार पडला. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा, उप प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, आनंद मुथा, सत्येन भास्कर, सफायर क्लबच्या अध्यक्षा सरला जॉय, आयोजक अब्दुल जाफर, हरिदास नायर, जॉय जोसेफ, व्ही.एम.कबीर, राजन नायर आदी उपस्थित होते.

एमआयडीसीत ड्रेनेजलाइनचा अभाव

भोसरी - भोसरी एमआयडीसी परिसरात ड्रेनेजलाइन नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. येथून कररूपाने सर्वाधिक महसूल मिळत असूनही महापालिका ड्रेनेजलाइनची सुविधा देत नसल्याने लघुउद्योजकांमधून संताप व्यक्त होत आहे.  

लोहमार्ग दुरुस्तीसाठी चार लोकल रद्द

पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यानच्या लोहमार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने या मार्गावर धावणाऱ्या दुपारच्या वेळेतील चार लोकल १७ ऑक्‍टोबरपर्यंत रद्द केल्या आहेत. पुण्याहून लोणावळ्याला दुपारी सव्वाबारा आणि एक वाजता जाणारी लोकल आणि लोणावळ्याहून दुपारी दोन आणि पावणेचार वाजता पुण्याला येणाऱ्या लोकलचा त्यात समावेश आहे. एक ऑक्‍टोबरपासून रेल्वे प्रशासनाने या मार्गावर देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यात सिग्नल यंत्रणा, रुळांची दुरुस्ती कामे करण्यात येणार आहेत. 

सुदर्शननगर चौकात ग्रेड सेपरेटर

पिंपरी - सुदर्शननगर चौकात ग्रेड सेपरेटर (समतल विलगक) करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्यामुळे तेथील वाहतूक कोंडीची समस्या संपेल, तसेच हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्यांनाही येथून वेगाने मार्गस्थ होता येईल. नाशिकफाटा ते वाकड या बीआरटी मार्गावरील या प्रकल्पासाठी २७ कोटी रुपये खर्च होणार असून, दोन वर्षांत तो पूर्ण करण्यात येणार आहे.

पासपोर्ट पोलिस व्हेरिफिकेशन आता 11 दिवसांत

पुणे - पासपोर्ट काढताना पोलिस व्हेरिफिकेशनसाठी (पारपत्र पडताळणी) लागणारा कालावधी कमी होऊन तो 11 दिवसांवर आला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पासपोर्ट आणखी लवकर मिळणार आहे.

विषाणू आढळलेल्या पोलिओ लसींचा पुरवठा महाराष्ट्रात झाला नाही – आरोग्यमंत्री

मुंबई: ज्या कंपनीच्या पोलिओ लसींच्या उत्पादनात टाईप टू‘ विषाणू आढळला आहे त्या बॅचचा पुरवठा महाराष्ट्रात झाला नाहीअसे केंद्र शासनाच्या लसीकरण विभागाने स्पष्ट केले आहेअशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली. दरम्यानउद्या दिल्ली येथे याबाबत उच्चस्तरीय बैठक होणार आहे.

सोसायटींमधील समस्यांसाठी आमदार सरसावले!

पिंपरी – भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध सोयट्यांमधील नागरिकांना बांधकाम व्यावसायिकांकडून अपेक्षीत किंवा निर्धारित केलेल्या सुविधा मिळत नाहीत. सोसायटीचा प्लॅन, सॅंक्‍शन ते बिल्डिंग कम्पिशन, सोसायटी हॅन्ड ओव्हर करण्याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. विकसकांच्या मनमानीमुळे सोसायटीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य सदनिकाधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.

15 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पिंपरी – पोलीस आयुक्तालयातील दिघी, आळंदी, तळेगाव एमआयडीसी येथील पोलीस निरीक्षकांसह 15 पोलीस निरीक्षकांच्या बुधवारी (दि. 3) पुन्हा बदल्या करण्यात आल्या आहेत.

अतिक्रमणांवर पिंपरीत कारवाई

पिंपरी – पिंपरी कॅम्प परिसरात शगुन चौक, डिलक्‍स टॉकीज, जयहिंद शाळेसमोर, पिंपरी स्मशानभूमी शेजारी तसेच काळेवाडी पुलाजवळ महापालिकेच्या वतीने बुधवारी (दि. 3) अतिक्रमण करवाई करण्यात आली.

राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी निविदा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती चौक येथे देशातील सर्वाधिक 107 मीटर उंचीवर उभारलेल्या राष्ट्रध्वजाची शिलाई उसवल्याने स्वातंत्र्य दिनानंतर हा ध्वज उतरवून ठेवण्यात आला होता. मात्र, आता हा राष्ट्रध्वज आठ महिने फडकवत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भारत-पाकिस्तानच्या वाघा बॉर्डरवर मोठ्या उंचीवर ध्वज फडकविण्याचे काम करणाऱ्या संस्थेला आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी दिली.

भाजप नगरसेवक गायकवाड, बोईनवाड यांच्या अडचणींत वाढ

पिंपरी– महापालिकेतील भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड आणि यशोदा बोईनवाड या दोघांनाही 11 ऑक्‍टोबरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत आहे. अन्यथा तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसांत हे दोन्ही नगरसेवक जात वैधता प्रमाणपत्र सादर करु न शकल्यास, सत्ताधारी भाजपसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.

कचराप्रश्‍नी भाजपचे पितळ उघडे

पिंपरी – शहरातील कचरा समस्या सुटावी, अशी आमची मनापासून इच्छा आहे. मात्र, अवलोकनाच्या विषयाला चुकीच्या पद्धतीने विसंगत असलेली 570 कोटीच्या खर्चाची उपसूचना सत्ताधारी भाजपने दिली. पीठासन अधिकारी असलेले महापौर व आयुक्तांना देखील ही उपसूचना समजली नाही. राष्ट्रवादीच्या विरोधानंतर प्रति टन 230 रूपये दर कमी करण्यात आला आहे. आता सभागृह नेते एकनाथ पवार यांना भ्रष्टाचाराचे आणखी कोणते पुरावे हवे आहेत? असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. बुधवारी (दि. 3) ते पत्रकारांशी बोलत होते.

शहरात “व्हिटामीन-सी’ औषधांचा तुटवडा

पिंपरी – सध्या बदलत्या वातावरणामुळे रुग्णांची संख्या वाढत असतानाच काही महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. विशेषतः व्हिटामीन-सी च्या औषधांचा स्टॉक संपत आला असून उत्पादन देखील कमी झाले असल्याचे औषध विक्रेत्यांचे मत आहे. ही औषधे तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालापैकी 60 टक्‍के कच्चा माल चीनमधून येतो. या कच्च्या मालाचा पुरवठा थांबल्यामुळे तसेच सरकारकडून काही औषधांच्या किंमतींवर नियंत्रण घालण्यात आल्याने देखील उत्पादन कमी झाले आहे.

पंतप्रधान मोदींना संयुक्तराष्ट्रांचा चॅम्पियन ऑफ अर्थ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली: संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्तोनिओ गुटेर्रेस यांच्या हस्ते आज दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्तराष्ट्रांचा चॅम्पियन ऑफ अर्थ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून फ्रांसचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या समवेत मोदींना हा पुरस्कार संयुक्तपणे प्रदान करण्यात आला.

बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या 51 शाखा होणार बंद

पुणे, दि. 3- सार्वजनिक क्षेत्रातील “बॅंक ऑफ महाराष्ट्र’ने आपल्या 51 शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंक क्षेत्रात खर्च कपातीचे धोरण राबवले जात आहे. त्याचाच भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे बॅंकेच्या अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

रायपूर पेरू बाजारात दाखल

पिंपरी – पिंपरी बाजारात रायपूर पेरू दाखल झाला आहे. या पेरूच्या आकाराकडे बघताच क्षणी ग्राहक आकर्षित होत आहेत. बाजारात तुरळक ठिकाणीच रायपूर पेरू बघायला मिळत आहे.

शाळा, महाविद्यालयांना “होमगार्ड काका’ देणार संरक्षण

पुणे – शहरी तसेच ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थीनींना दिलासा देण्यासाठी होमगार्डचा बंदोबस्त देण्यात येणार आहे. त्याचे परिपत्रक शासनाच्या वतीने जारी करण्यात आले आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजवाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढील कालावधीत “होमगार्ड काका’ विद्यार्थीनींचे संरक्षण करणार असून ते रोडरोमिओंचा बंदोबस्त करणार आहेत.

थेरगाव येथील उड्डाणपुल ‘विद्रुप’ केल्याप्रकरणी खाजगी संस्थेला ५ हजाराचा दंड

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील उड्डाणपुलाखालील परिसर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी एका खाजगी कंपनीला ५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. झोलो स्टेज् पी.जी. असे या संस्थेचे नाव असून उड्डाणपुलाच्या पिलरला बेकायदेशीरपणे जाहिरातीचे स्टिकर लावल्याप्रकरणी महापालिकेने ही कारवाई केली आहे. थेरगाव येथील थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या जागृकतेमुळे ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पिंपरी – चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंत्याचा डेंगीमुळे मृत्यू

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांचा आज (बुधवारी) डेंगीमुळे मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालविली.

बांधकाम कामगारांना घरासाठी दोन लाखांचे अर्थ सहाय्य

पिंपरी – बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याबरोबरच अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी बांधकाम कामगार सेनेची होती. दोन लाखांपर्यंत अर्थ सहाय्य देण्यास राज्य सरकारकडून मान्यता दिली आहे. बांधकाम कामगार सेनेच्या प्रयत्नाला यश मिळाल्याचा दावा संस्थेचे अध्यक्ष जयंत शिंदे यांनी केला आहे.

संत रविदास बहुउद्देशीय संस्थेमार्फत वृक्षारोपण

चिंचवड- संत रविदास बहुउद्देशीय संस्थेच्यातवीने घोराडेश्‍वर डोंगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. नगरसेवक भिमा बोबडे, नगरसेवक नामदेव ढाके, कात्रज येथील महिला संघटना व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जिल्हा अध्यक्षा लहु वाघमारे आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सावरकर मंडळ, निसर्ग मित्र विभाग, निगडी संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. संत रविदास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सकाळी साडे सहा ते नऊ दरम्यान हा कार्यक्रमा आयोजित करण्यात आला होता. यावेळी चंद्रकांत लांडगे, शरद झरेकर, नितीन सातपुते, दिनेश जाधव, मनिषा म्हस्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते.