Monday, 10 December 2012

विमानतळाविरोधात शेतकरी एकवटला!

विमानतळाविरोधात शेतकरी एकवटला!: - आंदोलनाची दिशा लवकरच
- पक्षबिक्ष काही नाही, शेतकरीच आमचा पक्ष; लढत राहू!
पाईट। दि. ९ (वार्ताहर)

यापुढे पक्षबिक्ष काही नाही, शेतकरीच आमचा पक्ष..लढत राहू असा एकमुखी निर्णय घेत होऊ घातलेल्या विमानतळाविरोधात पाच गावांतील शेतकरी एकवटला.

धामणे (ता. खेड) येथे शेतकर्‍यांची बैठक झाली. त्यामध्ये माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विमानतळ विरोधाचा लढा लढण्याचा त्यांनी निर्धार केला असून आंदोलनाची दिशा लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले. कोये, धामणे, रौंधळवाडी, पाईट परिसरातील १६00 हेक्टर क्षेत्र विमानतळासाठी निश्‍चित केल्यानंतर लगोलग झालेल्या हवाई पहाणीमुळे येथील शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी तातडीने बैठक घेतली.

यावेळी शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला. जमीनी वाचविण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी त्यांनी केली आहे. परिसरातील शेतकरी असंघटीत, नेतृत्वहीन व गाफील असल्याच्या मस्तीत शासन असले तरी त्यांना आंम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार त्यांनी केला. पुढील लढय़ासाठी ५0 हजारांवर लोकवर्गणी शेतकर्‍यांनी देवून आर्थिक बळही कमी पडू दिले जाणार नसल्याचे दाखवून दिले.

पाईटचे माजी सरपंच बळवंत डांगले, धामणचे माजी सरपंच अंकुश कोळेकर, कोयेचे उपसरपंच बबन राळे, बाळासाहेब मोरे, कुरकुंडीचे सरपंच कैलास कोळेकर यांनी संतप्त भघवना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक अंकुश कोळेकर यांनी केले तर आभार पप्पू राळे यांनी मानले. विमानतळ विरोधी कृती समिती तयार केली आहे.

भामा आसखेड धरणाचे काम सुरू करताना अगोदर पुनर्वसन मग धरण म्हणत धरणाचे काम पूर्ण केले तरी पुनर्वसन झाले नाही. लाभ क्षेत्रातील पुनर्वसनासाठीच्या जागा अगोदरच लाटल्या. ३000 एकर जमिनी धरणात गेल्या. मग विमानतळाच्या जागेसाठी हट्ट का? आंम्ही कोर्टात जाऊ पण विमानतळ होऊ देणार नाही.
- बळवंत बांगले , माजी सरपंच (पाईट)

शासन शेतकर्‍यांचा विरोध नाही. पुणे-मुंबईला राहणार्‍या गुंतवणुक दारांच्या जमिनी आहेत, असे चुकीचे दृष्य लोकांसमोर उभे करत आहे. त्याला बळी न पडता शेतकरी आंदोलनाच्या मार्गाने जमिनी कोणाच्या हे शासनाला दाखवून देईल.
- अंकुश कोळेकर , माजी सरपंच (धामणे)

विमानतळासाठी जाणार्‍या जमिनी या परिसरातील शेतकर्‍यांच्याच असून आता जागा देणार नाही
- बबन राळे, उपसरपंच (कोये)

शासनाच्या नाकर्तेपणामुळे भामा असखेड धरण उशाला असताना परिसरातील जमिनी मात्र कोरडवाहू राहील्या तसेच धरणकाठी, नदीकाठी, विमाणतळ करताना पर्यवरणाचे प्रचंड नुकसान होत असल्याने कायदेशिर मार्गानेच लढणार आहोत.
- बाळासाहेब मोरे

भेद माणसांनी केला! - माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

भेद माणसांनी केला! - माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील: - कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या सोहळ्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे मत
पिंपरी । दि. ९ (प्रतिनिधी)

बुद्धिमत्ता हा जन्मसिद्ध हक्क नाही, ती परमेश्‍वराची देणगी आहे. परमेश्‍वराने कोणताही भेदभाव केला नाही, तो माणसांनी केला आहे. शिक्षणातून दुर्बलांना बळ देण्याचे काम कॅम्प एज्युकेशन सोसायटीने केले आहे. ही कौतुकास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज काढले.

प्राधिकरणातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या सांगता समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी देवीसिंह शेखावत होते. व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, सचिव मोहिनी तेलंग, खजिनदार वसंत पवार, अमरसिंह राणे आदी उपस्थित होते.

या वेळी ‘शतकोत्तर रजतरंग’ स्मरणिकेचे प्रकाशन प्रतिभाताईंच्या हस्ते झाले. या वेळी उद्योगपती रसिकलाल धारिवाल, प्रतिभाताईंच्या कन्या ज्योती राठोड, कष्टकर्‍यांचे नेते बाबा आढाव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पाटील म्हणाल्या, ‘‘महात्मा जोतिबा फुलेंच्या प्रेरणेतून शेतकरी, कष्टकरी गरीब कुटुंबीयांना शिक्षण देण्यासाठी या संस्थेची सुरुवात झाली. दीनदलित महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समाजसुधारकांचे मोलाचे योगदान आहे. महिलांना साक्षर करण्यात फुलेंचे योगदान मोलाचे आहे. गरिबांबद्दल सहानुभूती असणे वेगळे परंतु कणव असणे गरजेचे असते. प्राणांची पर्वा न करता सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. स्फूर्तिदायक इतिहास या कॅम्प एज्युकेशनचा असून, आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंसारख्या दिग्गजांनी योगदान दिल्याने संस्थेचा वटवृक्ष बहरला आहे. वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम मोलाचे आहे.’’

‘‘बुद्धिमत्ता देण्यात परमेश्‍वर जात-पात कधीच पाहत नाही. शिक्षणाला तिसरा डोळाही मानला गेला आहे. सामाजिक समानता आर्थिक समानता आणण्याचे कार्य देशात होत आहे. ते आणखी प्रभावीपणे होण्याची गरज आहे. मजूर समाजाच्या मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम ही संस्था करीत आहे. आर्थिक नियोजन व व्यसनाधीनतेने आजही हा समाज ग्रासलेला आहे. त्यामुळे विकासापासून वंचित राहिला आहे. मजुरांच्या विकासासाठी त्याची व्यसनाधीनता दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.’’

संचेती यांनी प्रास्ताविक केले. मंजिरी ब्रrो यांनी सूत्रसंचालन केले. सहिष्णूतेस दाद
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे भाषण सुरू होताच अचानक वीज गेली. त्यामुळे संयोजकांची पुरती तारांबळ उडाली. १५ मिनिटांनी वीज आली. त्यावर प्रतिभाताई म्हणाल्या, ‘‘१२५ वर्षांची ज्ञानदानाची परंपरा या संस्थेला आहे. दुर्बल वंचित घटकांसाठी त्यांनी कार्य केले आहे. त्यामुळे काही वेळ वीज गेली म्हणून विचलित होण्याचे कारण नाही. अडचणीतून तुम्ही अनेक वर्षे काढली. त्यामुळे झालेली गैरसोय त्यापुढे काहीच नाही.’’ प्रतिभाताईंच्या या सहिष्णूतेला उपस्थितांनी दाद दिली.

रेशन दुकानदारांचा उद्या लाक्षणिक बंद

रेशन दुकानदारांचा उद्या लाक्षणिक बंद: पिंपरी । दि. ९ (प्रतिनिधी)

विविध मागण्यांसाठी राज्यातील रेशन दुकानदारांनी मंगळवारी (दि. ११) लाक्षणिक बंद पुकारला आहे. रोख सबसिडी नको धान्य व रॉकेल, गॅस हवा, कमिशन व मानधन नको वेतन हवे, अशी या दुकानदारांची प्रमुख मागणी आहे. अखिल महाराष्ट्र रेशन व रॉकेल दुकानदार फेडरेशनने हा निर्णय घेतला आहे.

सर्व कार्डधारकांना साखर, रॉकेल, गॅस सवलतीच्या दरात मिळायला पाहिजे. स्वस्त धान्य दुकानातून १४ जीवनोपयोगी वस्तू व खुल्या बाजारातील धान्य विक्रीची परवानगी मिळायला पाहिजे.या मागण्यांसाठी दुकान बंद ठेवून आपापल्या तहसील कार्यालयासमोर मोर्चा, धरणे आंदोलन, निदर्शने करणार आहेत. मोर्चा व निदर्शने करूनही सरकारने मागण्यावर कोणताही निर्णय घेतला नाही, तर संपूर्ण भारत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तलवारीने वार केल्याने निगडीत दोघे जखमी

तलवारीने वार केल्याने निगडीत दोघे जखमी: पिंपरी । दि. ९ (प्रतिनिधी)

मित्राच्या पत्नीला छेडल्याचा जाब विचारल्याने दोघा तरुणांवर तीन गुंडांनी तलवारीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना निगडी येथील टिळक चौकात रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघा हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली.

विनोद सोपान काळभोर (वय २२, सुदर्शननगर, आकुर्डी) व सत्यवान रामबापू राम (२१, यमुनानगर, निगडी) ही गंभीर जखमींची नावे असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रणजित बापू चव्हाण (१९), राकेश बाळासाहेब गंगावणे (१९) व आकाश नवनाथ कसबे (१८, सर्व रा. दळवीनगर, चिंचवड) ही आरोपींची नावे आहेत.

पत्नीस आणण्यासाठी काळभोर मित्रासह टिळक चौकात आले होते. त्या वेळी तिघा तरूणांनी महिलेची छेड काढली. वादावादी होऊन तिघांनी तलवारीने हल्ला करून काळभोर व राम यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिघांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता १३ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

फळ, भाजीपाल्याचे भाव उतरले

फळ, भाजीपाल्याचे भाव उतरले: पिंपरी । दि. ९ (प्रतिनिधी)
मंदावलेली आवक पुन्हा वेगात सुरू झाल्याने मंडईत मोठय़ा प्रमाणात फळ व भाजीपाल्याचा माल आला आहे. त्यामुळे मंडई ताज्या व स्वच्छ फळ व भाजीपाल्याने पुन्हा भरली आहे. आवक वाढल्याने २0 ते ३0 टक्क्यांनी भाव घसरले.

आडत्यांच्या बंदमुळे शेती मालाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे भाव वाढले होते. बंद मिटल्यानंतर पुन्हा पूर्ववत आवक सुरू झाली आहे. मटार, काकडी, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, रताळी, तसेच मेथी, शेपू, कोथिंबीर, पालक, मूळा, कांदापाला आदीची मोठी आवक झाली. गाजर व आवळा दाखल झाला आहे. मटारचे भाव ५0 ते ६0 वरून ३0 ते ३५ रुपये किलो झाले. कांदा २0, बटाटा १६ ते २0, टोमॅटो ७ ते १0, वांगी २0, गाजर २५ ते ३0, काकडी २५ ते ३0, बीट २0 रुपये असा किलोचा दर होता.

बोरांची आवक
मंडईत बोराची मोठय़ा प्रमाणात आवक झाली. चांगल्या दर्जाची बोरे ८0 रुपये व छोटी बोरे ३0 ते ४0 रुपये किलो होती. सीताफळाचा ४0 ते ८0 रुपये किलो भाव होता. चिकू ६0 ते ८0, डाळिंब ८0 ते १२0, संत्री ६0 ते ८0, मोसंबी ४0 ते ६0, पपई ४0, कलिंगड ३0 रुपये किलो दर होता.

आयुक्तांच्या कारभाराबाबत "दादा'गिरी करणाऱ्यांना अजितदादांनी रोखावे

आयुक्तांच्या कारभाराबाबत "दादा'गिरी करणाऱ्यांना अजितदादांनी रोखावेबदल हा निसर्गाचा नियम आहे. जो काळानुसार बदलतो तो टिकतो. पुराणातील वांगी चघळत इतिहासातच रमणारी मंडळी मात्र प्रवाहाच्या बाहेर फेकली जातात. सर्व क्षेत्रात गेल्या वीस वर्षांतील होणारे बदल हे त्याचे बोलके उदाहरण आहे. अशा स्थितीत जर कोणी बदलत नसतील, तर प्रसंगी माणसे बदलावी लागतात. पिंपरी- चिंचवड महापालिकेला तीस वर्षे होऊनही मोठ्या ग्रामपंचायतीसारखाच कारभार सुरू होता. चार गावांचे हे "शहर' होते. आता त्याची वाटचाल महानगराच्या दिशेने सुरू आहे. मात्र कारभारी आणि कारभारसुद्धा चावडीच्या पारावरच थबकला होता. तो चेहरा आणि चित्र बदलण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा महिन्यापूर्वी अभ्यासू, निःस्वार्थी, कठोर, शिस्तप्रिय प्रशासक म्हणून डॉ. श्रीकर परदेशी यांना आणले. पारदर्शक, स्वच्छ, नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख कारभाराची अपेक्षा दादांना त्यांच्याकडून आहे. अल्पावधीत त्यांनी त्याची चुणूक दाखवली. त्यामुळे अनेकांचे पितळ उघडे पडले, पोटात दुखू लागले. खरे तर अशा प्रवृत्ती रोखण्यासाठी दादांनी आणि शिस्तप्रिय जनतेने पुढे आले पाहिजे
आयुक्तांच्या कारभाराबाबत

"ब्लॉकक्‍लोजर'मुळे लघुउद्योगांना फटका

"ब्लॉकक्‍लोजर'मुळे लघुउद्योगांना फटका पिंपरी - पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील टाटा मोटर्स व सॅण्डविक एशिया कंपनीच्या "ब्लॉकक्‍लोजर'चा फटका स्थानिक लघुउद्योगांना बसत आहे. केंद्र सरकारने कर्जावरील व्याजदर आणि वीजदर कमी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष नितीन बनकर यांनी "सकाळ'कडे केली आहे. 

औद्योगिकनगरीमध्ये बजाज ऑटो, अल्फा लाव्हल, ऍटलास कॉप्को, सॅण्डविक एशिया, इटॉन, एक्‍साइड आदी पाच ते सहा हजार कंपन्या आहेत. यातील पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक कंपन्या टाटा मोटर्स या कंपनीवर अवलंबून आहेत. कंपनीने 24 ते 26 डिसेंबर तर सॅण्डविक एशियाने 7 ते 15 डिसेंबरदरम्यान "ब्लॉकक्‍लोजर' जाहीर केला आहे. त्यामुळे लघुउद्योगांबरोबर त्यांच्याकडील कामगारांनाही फटका बसत आहे.

संगणकावर करा, परीक्षेचा मोफत सराव

संगणकावर करा, परीक्षेचा मोफत सराव पुणे - महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनतर्फे (एमकेसीएल) दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निवडक विषयांकरिता संगणकावर सराव परीक्षा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. एमकेसीएलच्या पाच हजारांहून अधिक प्रशिक्षण केंद्रांमधून विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल. 

PCMC to take action against unauthorized advertisements or hoardings

PCMC to take action against unauthorized advertisements or hoardings: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has decided to take severe action against people who put up hoardings and advertisements without taking permission from the civic body.

No space for buses, over 700 seized vehicles dumped in PMPML depots

No space for buses, over 700 seized vehicles dumped in PMPML depots: For the last four years, five PMPML bus depots have been accommodating 700 autorickshaws and taxis that were seized by the traffic police and RTO authorities for illegal plying in the city.

Fate of Pimpri abattoir ‘sealed’

Fate of Pimpri abattoir ‘sealed’: Following relentless opposition by the local residents, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) finally sealed its slaughterhouse located under Indira Gandhi flyover in Pimpri on Saturday amidst tight security.

'कायद्याच्या चौकटीत राहून धार्मिक संस्थाना सहकार्य करू'

कायद्याच्या चौकटीत राहून धार्मिक संस्थाना सहकार्य करू'
पिंपरी, 9 डिसेंबर
वनखात्याच्या संदर्भात असेलेले कायदे खूप किचकट आहेत. अनेक गोष्टी करण्यासाठी परवानगी मिळत नाही. मात्र, आपण या खात्याचा मंत्री झाल्यापासून यामध्ये शिथिलता आणण्याच्या प्रयत्न केला आहे. त्याबरोबर संत विशिष्ट समाजाचे नसून ते संपूर्ण समाजाचे असतात. त्यामुळे अशा धार्मिक संस्थाना कायद्याच्या चौकटीत राहून सहकार्य करू, असे आश्वासन राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी व्यक्त केले.
www.mypimprichinchwad.com

महावितरणच्या 'बत्ती गुल'चा माजी राष्ट्रपतींना फटका

महावितरणच्या 'बत्ती गुल'चा माजी राष्ट्रपतींना फटका
पिंपरी, 9 डिसेंबर
भारनियमनमुक्त महाराष्ट्राची घोषणा अजून तरी कायदावरच आहे. भारनियमन असो अथवा नसो महाराष्ट्रात वीजपुरवठा कधी खंडित होईल, याचा नेम नसतो. वीजपुरवठा खंडित होण्याचा फटका सर्वसामान्यांना नेहमीचाच आहे, मात्र माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना निगडी येथील एका कार्यक्रमात वीजपुरवठा खंडित होण्याचा चांगलाच फटका बसला. वीज गेल्यानं त्यांच्या भाषणात तब्बल 15 मिनिटांचा 'ब्रेक' घ्यावा लागला.
www.mypimprichinchwad.com

चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या

चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या
पिंपरी, 9 डिसेंबर
चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना आज सकाळी सव्वासातच्या सुमारास कासारवाडी येथे उघडकीस आली. मुलीच्या खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वेरूळावर फेकलेल्या स्थितीत आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
www.mypimprichinchwad.com