Friday, 10 January 2014

Citizens of Pimpri Chinchwad Municipal Corporation to get citizens' charter on January 26

A citizens' charter enlisting details of municipal services and the time period in which the services will be rendered will be released by the Pimpri Chinchwad Municipal Corporation on Republic Day.

आठ हजार नळजोड पाणीमीटरच्या प्रतीक्षेत

महापालिकेने शहराला 24 तास मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी सहा वर्षांपूर्वी मीटरसक्ती लागू केली. मात्र मीटर पध्दतीने पाणी बिले आकारण्यास नागरिकांचा सुरवातीपासून विरोध असल्याने अद्यापपर्यंत शहरातील तब्बल 7 हजार 854 जणांनी नळांना मीटर बसविले नसल्याचे समोर आले आहे.

एलबीटी चुकविणा-या 10 व्यापा-यांवर धाडी; 38 लाखांचा दंड

नऊ हजार व्यावसायिकांना एलबीटी दाखल्यांचे वाटप  
स्थानिक संस्था करापोटी (एलबीटी) 615 कोटी रुपयांचा महसूल महापालिकेला प्राप्त झाला आहे. गेल्या महिन्याभरात केलेल्या धडक कारवाईत 10 व्यावसायिकांवर धडक कारवाई करुन सुमारे 38 लाख रुपयांचा एलबीटी वसूल करण्यात

पिंपरीतील श्री गुरुनानक दरबारात महान प्रकाश उत्सव साजरा

पिंपरी कॅम्पमधील श्री गुरुनानक दरबार यांच्या वतीने साहेब गुरु गोबिंद सिंग महाराज यांच्या महान प्रकाश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम घेण्यात आले.

'आरटीओ'ने केली महापालिकेच्या वाहनांची तपासणी

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि कारओके  यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा अभियानांतर्गत आज घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये महापालिकेच्या शंभर वाहनांची मोफत तपासणी करण्यात आली.

पिंपरीत केबल व्यवसायिकांची रविवारी बैठक

करमणूक कर कमी करण्याच्या मागणीसाठी पुणे जिल्हा केबल ऑपरेटर्स असोसिएशनच्या वतीने केबल व्यवसायिकांची रविवारी (दि. 12)  पिंपरी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कांबिये यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

स्वरसागरमध्ये नृत्य व गायनाची बहारदार पर्वणी

स्वरसागर महोत्सवाच्या दुस-या दिवशी म्हणजे बुधवारी (8 जानेवारी पहिल्या सत्रात महापालिकेच्या संगीत अकादमीतील स्मिता देशमुख व वैजयंती भालेराव गायन, पंडित सुधाकर चव्हाण गायन व युवा भरतनाट्यम नर्तक परिमल फडके यांचे बहारदार नृत्य झाले.

केवळ २0 टक्के आरक्षणे विकसित

संजय माने, पिंपरी : विकास आराखड्यात ११६१.८२ हेक्टर क्षेत्रावर ११५0 आरक्षणे टाकण्यात आली आहेत. त्यांपैकी २९९.७७ हेक्टर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. उर्वरित ८६२.५ हेक्टर जागेचा अद्याप ताबा मिळालेला नाही. १९९७ ला मनपा हद्दीत १७ गावे समाविष्ट होऊन १७ वर्षांत केवळ २0 टक्के आरक्षणे विकसित झाली आहेत.

बक्षिसी परत करण्याची कर्मचार्‍यांवर वेळ

पिंपरी : जकात चोरी पकडून देणार्‍या कर्मचार्‍यांना महापालिकेतर्फे मुशाहिरा (बक्षीस) देण्यात येत असे. जकात चोरांकडून वसूल केल्या जाणार्‍या तडजोड शुल्कासह दहापट दंड रकमेच्या २0 टक्के रक्कम संबंधित कर्मचार्‍यांना दिली जात असे. जकातीच्या सुधारित नियमावलीतील तरतुदी, महापालिका सभेतील ठरावानुसार ही रक्कम वसूल करण्यात येणार असून, बक्षीस मिळविणार्‍या त्या कर्मचार्‍यांना आठ दिवसात रक्कम महापालिका कोषागारात भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

सांगवीत भरणार ‘पवनाथडी’

पिंपरी : बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालासाठी बाजारपेठ मिळावी, म्हणुन महापालिकेच्या पुढाकाराने पवनाथडी जत्रा उपक्रमाचे आयोजन केले जाते. ३0 जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रा उपक्रम घेण्याचा प्रस्ताव महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला.