Monday, 25 September 2017

आदिशक्‍ती – तळवडेची ग्रामदेवी घारजाई माता

पिंपरी – जगदंबेची विविध रूपं सर्वांनाच मोहीत करतात. कुठे दुर्गा तर कुठे चंडी लक्ष्मीचे रूप धारण करणारी ही कुलस्वामीनी सर्वत्र वसलेली आहे. फक्त तिचे नाव, रूप वेगळे असले तरीही, तिच्यावर प्रत्येकाची असलेली भक्ती काकणभर जास्तच. म्हणून प्रसिध्द असणारी रूपीनगर -तळवडे गावची ग्रामदेवी घारजाई माता.

Regularize illegal water lines: Savale

There are over 10,000 illegal water connections in the civic limits, which should be regularized to fetch additional revenue for the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), Savale said during a discussion on issues pertaining to water supply at ...

मी आयुक्त बोलतोय । स्वच्छ पिंपरी चिंचवड मिशन

मी आयुक्त बोलतोय । स्वच्छ पिंपरी चिंचवड मिशन: 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत संपूर्ण पिंपरी चिंचवड परिसर हागणदारी मुक्त घोषित करण्यासाठी महत्वाच्या सूचना आपल्यासमोर मांडत आहे. Important instructions to make Pimpri Chinchwad 100% Open Defecation free. Please hear my appeal


PCMC's 'JetPachter' brings pothole saga to an end

On one hand, PMC was not following the standard procedure, while on the other, neighbouring Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) showed the way by following the guidelines. Aiming to accelerate road repairs for this rainy season, PCMCon ...

पहिले मेट्रो स्टेशन मोरवाडी चौकात

पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या पहिल्या टप्प्याचे पहिले स्टेशन हे पंधरा मीटर उंचीवर (सुमारे पाच मजले) असणार असून, त्यासाठी मोरवाडी चौकात इमारत बांधण्यात येणार आहे. ट्रॅक कनेक्टर (ट्रॅक चेंजर) हा मोरवाडी चौकापासून २०० ...

पाणी पुरवठा विभागाला चुना?

52 लाखांचे धनादेश वटलेच नाही : वसुली पथकाचे दुर्लक्ष
पिंपरी – शहरातील नळजोड धारकांनी पाणीपट्टी थकबाकी पोटी दिलेले सुमारे 52 लाख 70 हजार 613 रुपयांचे धनादेश वटलेले नाहीत. महापालिका पाणी पुरवठा विभागातील वसुली पथकानेही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महापालिकेचे लाखो रुपये “पाण्यात’ गेले आहेत. धनादेश न वटलेल्या ग्राहकांवर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पूर्वसूचना न देताच महापालिकेची शाळा बंद

पिंपरी - पंधरा दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने ३९ शाळांचे एकत्रीकरण करून १९ शाळा बंद केल्या. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा महापालिकेच्या उरो रुग्णालय शाळा क्र. १००ला कोणतीही पूर्वसूचना न देता सोमवारपासून (ता. २५) शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी विद्यार्थी, पालक व शिक्षक धास्तावले आहेत. शाळा अचानक बंद झाल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांवर दुसरी शाळा शोधण्याची वेळ आली आहे. 

शिवसेना शहरप्रमुख ठरणार दसऱ्यानंतरच

पिंपरी - पिंपरी- चिंचवड शिवसेना शहरप्रमुख बदलण्याच्या हालचाली सुरू असल्या, तरी हा निर्णय दसरा मेळाव्यानंतरच होणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाची पीछेहाट झाल्यानंतर संपर्कप्रमुखांबरोबरच शहरप्रमुख बदलाचीही चर्चा सुरू झाली होती. आता दसरा मेळाव्यानंतर त्याला पूर्णविराम मिळेल, असे संकेत आहेत.

पिंपरीत गवार, काकडीची आवक वाढली

पिंपरी – पिंपरी उपबाजारात रविवारी फळभाज्या व पालेभाज्यांची आवक घटली आहे. सलग दोन आठवडे आवकेत घट होत असताना गवार व काकडीची आवक मात्र वाढली आहे.
भेंडीची आवक एक क्विंटलने घटली असून, सरासरी भाव 3100 रुपयांवर स्थिरावला. टोमॅटोची सहा क्विंटल आवक झाली असून, भावात 200 रुपयांची वाढ झाली. मिरचीची आवक स्थिर राहूनही भावात 1000 रुपयांची वाढ झाली. तर फ्लॉवरची आवक तीन क्विंटलने घटली. मक्‍याची आवक दोन क्विंटल झाली आहे. याशिवाय घोसावळेची सात क्विंटल तर भूईमुग शेंगांची एक क्विंटल आवक झाली आहे.

पिंपरी शहरात नवरात्रोत्सवाची वाढती रंगत, दिघीत नवदुर्गा महात्म्य

सांगवी : सांगवी परिसरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, महिला मंडळ आणि विविध मित्र मंडळांच्या विलोभनीय मूर्तींचे परिसरात भक्तिभावाने पूजन करण्यात येत आहे़ परिसरातील कीर्तीनगर, त्रिमूर्तीनगर, काटेपुरम चौक, 

मी संघाच्या शाखेत वाढलेला कार्यकर्ता: दिलीप कांबळे

जुनी सांगवी : मी सर्वसामान्य कुटुंबात वाढलोय. इतरांसारखा गुंठामंत्री किंवा वारसाने झालेला राजकारणी नाही. मी आज मंत्री असलो तरी आज ही मी झोपडपट्टीत राहतो. मी कुणाला घाबरत नाही. कारण मी कधी चुकीच करत नाही. मी संघाच्या शाखेत वाढलेला कार्यकर्ता आहे, असे पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथे दापोडी येथील अशोक गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या सुप्रिम कोर्टाने दिलेल्या जागेच्या निकालाबाबत विजयी मेळाव्यात समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळ यांनी म्हटले आहे.

दिवाळी पर्यटनाला “अच्छे दिन’

परदेशी पर्यटनाचा ओघ वाढला : महागाई, जीएसटीचा परिणाम नाही

पुणे – दिवाळी सुटीत पर्यटनाला जाण्याची “क्रेझ’ मागील काही वर्षात वाढली आहे. यातही नावीन्य शोधले जात आहे. पूर्वी पर्यटनाचा एक ठराविक साचा असायचा. यामध्ये निसर्गसौंदर्य किंवा देवदर्शन या दोनच गोष्टींना महत्त्व दिले जायचे. सध्या मात्र नाईटलाईफ, कॅसिनो, क्रूझ सफर, हनिमून, पर्यटन आणि “हटके डेस्टिनेशन’ असे पर्याय निवडले जातात. यातही परदेशी पर्यटनाचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे.