आठ नवीन मेट्रो मार्गांचा PMRDA करणार अभ्यास! ...परंतु निवडलेले आठ नवीन मेट्रो मार्ग पुणे महापालिका हद्दीमधील आहेत! पिंपरी चिंचवड शहराबद्दल क्या ख़याल है आपका? शहराचा मेट्रो विस्तार पूर्वसुसाध्यता (प्री फिजिब्लिटी) रिपोर्ट करण्याचे काम PMRDA ने तातडीने हाती घ्यावे. पिंपरी-निगडी विस्ताराचा DPR त्वरित पूर्ण करावा तसेच खालील दोन मार्गांचा प्रामुख्याने विचार होणे गरजेचे आहे...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 2 November 2017
पिंपरी-चिंचवड शहरात ६ स्थानके
पिंपरी - जुन्या पुणे- मुंबई रस्त्यावर सध्या मेट्रो प्रकल्पाच्या ३५ खांबांचे बांधकाम सुरू असून, पुण्यापेक्षाही पिंपरी- चिंचवडमध्ये काम गतीने होत आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या हद्दीत मेट्रोची सहा स्थानके आहेत. या स्थानकांची कामे लवकरच सुरू होतील.
सहा उर्दू शाळांना मंजुरी
पिंपरी - महापालिकेच्या अखत्यारीत असलेली एकमेव उर्दू शाळा कमी पडत असल्याने चार वर्षांपूर्वी शहरात सहा उर्दू माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. त्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेतला. मात्र राज्य सरकारची मंजुरी नसल्याने या शाळांतील विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांक मिळत नव्हता; तसेच शिक्षकांना वेतनही मिळत नव्हते. महापालिकेने परवानगीसाठी पाठपुरावा केल्यावर अखेर सरकारने या शाळांना मान्यता दिली. शाळांचा खर्च या संस्थांना स्वखर्चातून करावा लागणार आहे.
For next budget, PCMC invites suggestions from residents
THE PIMPRI-CHINCHWAD Municipal Corporation (PCMC) has invited suggestions from local residents on inclusions in the 2018-19 civic budget. Residents have been urged to post their suggestions on the PCMC website - http://www.pcmcindia.gov.in - or ...
डीएसकेंविरोधात तीनशे अर्ज दाखल
ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ३०० तक्रारदारांनी अर्ज केले आहेत.
Leaky pipeline fixed in Sudarshan Nagar
Pune Mirror had highlighted the problem at this spot on October 20, after area residents complained about overflowing water resulting in a huge pothole, which was later covered with rubble and tar by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), ...
On Pune's dangerous roads, 175 bikers dead and counting
Both the Pune Municipal Corporation (PMC) and the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), which are supposed to ensure that the roads remain in good condition, have been found wanting in the task. Speaking on the issue, Pune Police ...
अधिकारी मद्यप्राशन करून झिंगाट आणि सुसाट?
महापालिका वाहनाचा गैरवापर ः दुभाजकावर चढवली सुमो, दोन तास चालले नाटक
पिंपरी, प्रतिनिधी – पालिकेचे वाहन नशेत थेट दुभाजकावर चढविण्याची घटना काळेवाडी परिसरात घडली. काळेवाडी येथील खादी भंडारासमोर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मद्यप्राशन करून थेट दुभाजकावरच गाडी चढवली असल्याची चर्चा सध्या काळेवाडी परिसर आणि पालिकेत चांगलीच रंगत आहे. नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात कोणीही दगावले नाही. मात्र पिपंरी चिंचवड महापालिकेच्या वाहनात चक्क पालिकेचे कर्मचारी मद्यप्राशन करून बसले असल्याची धक्कादायक माहिती प्रकाशात आली आहे. स्थानिक नागरिकांनुसार हा अपघात अति मद्यपानामुळे झाला आणि त्यानंतरही पालिकेच्या मद्याच्या नशेत धुंद झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी येथे तब्बल दोन तास गाडी दुभाजकावरुन काढण्याचे वेगवेगळे प्रकार करून दाखवले.
आंतरराष्ट्रीय ब्रेड दिन साजरा
पिंपरी, प्रतिनिधी – चिंचवड येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ.अरविंद ब. तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे आंतरराष्ट्रीय ब्रेड दिन साजरा करण्यात आला.
मंगळवारी दि. 31 रोजी सिम्बोयसिस स्कूल ऑफ कलिनरी आर्ट बेकरी विभागप्रमुख पंकज देशपांडे यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. बीएससीएचएसच्या द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील बेकरीचे शेफ प्रा. रोहन वाडकर यांच्या मदतीने वेगवेगळ्या देशातील विविध प्रकारचे ब्रेड बनविले होते. त्यामध्ये जर्मनी, इटली, फ्रांस आणि अमेरिका अशा देशांचा समावेश करण्यात आला होता.
उद्योजकांच्या समस्यांबाबत महिनाभरात उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक – खासदार श्रीरंग बारणे
पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजकांच्या समस्यांबाबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीमध्ये महिनाभरात बैठक आयोजित केली जाईल, अशी घोषणा खासदार श्रीरंग बारणे यांनी केली
Subscribe to:
Posts (Atom)