Monday, 17 September 2018

“पिक अवर्स’ मध्ये दर तीन मिनिटाला मेट्रो?

पिंपरी – मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या “डीपीआर’ मध्ये मेट्रोने सखोल अभ्यास केला असून या मार्गावरील “रायडरशीप’ अर्थात या मार्गावर सर्वप्रकारे प्रवास करणारे प्रवासी याची देखील इत्यंभूत माहिती गोळा केली आहे. पीएमआरडीएने मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या कॉमन मोबिलिटी प्लॅनच्या धर्तीवरच येथे देखील अभ्यास झाला असून “पिक अवर्स’ (अत्याधिक वर्दळीच्या वेळी) मध्ये या मार्गावर ताशी 19 हजार प्रवासी मिळू शकतील अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व प्रवाशांना मेट्रोची सुविधा देण्याचा प्रयत्न केल्यास मेट्रोला दर तीन मिनिटाला एक मेट्रो धावावी लागेल.

बीआरटी मेट्रोला पूरक हवी - ओजस कुलकर्णी

पिंपरी - ‘‘आकुर्डी चौक ते प्राधिकरण वळणादरम्यानच्या १.४ किलोमीटरच्या अंतरावर सहा वेळा वेग कमी करावा (स्लोडाउन) लागतो. त्यामुळे ती वेगवान सेवा कशी होईल, याचा विचार करायला हवा. येत्या काही काळात मेट्रो सेवा सुरू झाल्यावर बीआरटीने कोण प्रवास करेल? त्यामुळे बीआरटी सेवा ही मेट्रोला पूरक ठरणारी असायला हवी,’’ असे प्रतिपादन पुणे अर्बन लॅब ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे वास्तुरचनाकार ओजस कुलकर्णी यांनी निगडी येथे केले.

Nigdi-Dapodi BRTS Lane: PMPML takes action against bus drivers flouting traffic rules

THE Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) has cracked the whip on drivers for not following traffic rules and skipping lanes while taking the newly opened Nigdi-Dapodi Bus Rapid Transit System (BRTS) stretch.

शहरातील लघु उद्योजकांची बैठक उद्या

पिंपरी – पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना व पवना औद्योगिक वसाहत यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योगासमोरील समस्या व तोडगा यावर मंगळवारी (दि. 18) बैठक होणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली. पिंपरीतील पवना औद्योगिक वसाहत सोसायटीच्या सभागृहात दुपारी दोन वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे नवनियुक्‍त अध्यक्ष संदीप जोशी मार्गदर्शन करणार आहेत.

विरुद्ध दिशेने येणाऱ्या तिघांना न्यायालयाने केला दंड

पिंपरी (पुणे) : वाहतूक नियम पायदळी तुडवत विरुद्ध दिशेने वाहने चालविणारे वाहनचालक संकेत सतीश निमट व नितीन गायकवाड यांना प्रत्येकी दोन हजार 500 रूपये तर चंद्रकांत थोरात याला पिंपरी न्यायालयाने एक हजार 100 रुपये दंड ठोठावला. 

#PuneNashikRailway पुणे-नाशिक रेल्वे अवघ्या दोन तासांत !

पुणे  - पुणे-नाशिक लोहमार्गावर पारंपरिक रेल्वेचा आराखडा तयार झाला असला, तरी या मार्गावर स्पीड रेल्वे सुरू करता येईल का?, यासाठी पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीने (एमआरआयडीएल) सुरवात केली आहे. त्यानुसार प्रकल्प सुरू झाल्यास प्रवाशांना अवघ्या दोन तासांत पुण्याहून नाशिकला जाता येईल. 

देहूरोड उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वाकडे

देहू - पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथे उड्डाण पुलाचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले आहे. दिवाळीपूर्वी या पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

Breaking News : कोल्हापूर ते पिंपरी ‘ग्रीन कॅारिडोर’

डी.वाय.पाटील रुग्णालयात पहिल्यांदाच लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
निर्भीडसत्ता न्यूज – 
कोल्हापूर येथील कसबा बावडाच्या  डायमंड रुग्णालयातून ब्रेनडेड रुग्णांने केलेल्या अवयवदानामुळे  पिंपरीतील दोघांचे प्राण वाचणार आहे. कोल्हापूरातून आणलेले ‘ह्रदय’ हे थेरगांवच्या आदित्य बिर्ला हॅास्पीटलला तर ‘लिव्हर’  पिंपरीतील डॅा. डी.वाय.पाटील रुग्णालयास रस्ता मार्गाने रुग्णवाहिकेमार्गे दाखल झाले. त्यावेळी कोल्हापूर ते पिंपरी पर्यंत या 248 किमीच्या अत्यंत गजबजलेल्या रस्त्यावर ग्रीन कॅारिडोर तयार करण्यात आला. अवघ्या तीन तासात रुग्णावहिकेने 248 किमीचे अंतर कापले आहे. दरम्यान, पिंपरीतील डॅा.वाय.पाटील रुग्णालयात पहिल्यादांच लिव्हर प्रत्यारोपण आज (रविवारी) शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Metro officials clueless, worried over delay in getting nod for Khadki stretch

MahaMetro managing Director Brijesh Dixit said at a press conference in the city on Saturday that the rail project will get delayed if the Defence Ministry does not approve the land acquisition proposal in Khadki area. The MahaMetro is seeking permission from the Defence Ministry to acquire 10 acres of defence land in Khadki.
Delhi Metro, Delhi Metro rail corporation, DMRC, Pink Line, Durgabai Deshmukh South campus to Lajpat Nagar, DD south campus to Lajpat nagar, Hardeep Singh Puri, Arvind Kejriwal, Delhi News, Indian Express

पुणे मेट्रोची धाव ‘इक्रो-फ्रेन्डली’

महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने विकसित करण्यात येत असलेल्या पुणे मेट्रो ही ‘इक्रो-फेन्डली’ (पर्यावरणपूरक) आहे. सौर उर्जेतून वीज निर्मिती केली जाणार असून, मेट्रो धावताना, स्टेशनवरील लिफ्ट खाली येताना वीज निर्माण होणार आहे. नागपूर पाठोपाठ ही मेट्रो ‘ग्रीन मेट्रो’ असल्याचा दावा महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी शनिवारी (दि.15) केला. 

Fix sanitation workers' problems, PCMC told

Three natl commissions issue notices; ask civic body why it didn’t felicitate workers

पीएमपीएलच्या ८ कोटींची राख!

इंधन दरवाढीच्या कचाट्यात सापडलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएल) वारंवार होणारे बसेसचे शॉर्टसर्किट जोर का  झटका देत आहे. त्याबरोबर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मागील अडीच वर्षांत बसेसच्या इंजिन वायरिंगमध्ये बिघाड होऊन तब्बल 23 बसेस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. त्यामुळे महामंडळाला 5 कोटींवर तोटा सहन करावा लागला. तसेच  दुर्घटनाग्रस्त बस साधारणपणे 15 दिवस रस्त्यावर न धावल्यामुळे दरदिवसाला महामंडळाला मिळणारे 10 हजारांचे नुकसान, जवळपास साडेतीन कोटींवर नोंदविले गेले आहे. मिळून पीएमपीएलच्या नुकसानीसह उत्पन्नांची  8 कोटींची राख झाली आहे.

महापालिकेची ‘पीएमपीएमएल’ला तंबी

‘बीआरटीएस’मध्ये बस चालक करतात नियमांचे उल्लंघन
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बीआरटीएस मार्गावरील पीएमपीएमएलच्या बस चालकांकडून सिग्नलचे पालन केले जात नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे महापालिकेने पीएमपीएलला पत्र पाठवून चालकांना नियमांचे पालन करण्याची सक्त ताकीद देण्यात यावी, अशी तंबी दिली आहे.

"लिव्हेबल सिटी'साठी प्रयत्न - श्रावण हर्डीकर

पिंपरी - पिंपरी- चिंचवड शहरात पुरेशा पायाभूत व नागरी सुविधा देत हे शहर राहण्यासाठी जास्तीत जास्त चांगले बनविण्याकडे येत्या वर्षांत भर दिला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी (ता. 14) सांगितले. नदीसुधार योजना, पाणीपुरवठा योजना, कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प राबविण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

पिंपरी चिंचवडचा सांप्रदायायिक वारसा जपण्याचे काम करू – महापौर राहुल जाधव

पिंपरी (Pclive7.com):- सामान्य जनतेचे काम करणे हेच लोकप्रतिनिधींचे काम असते. जनता काम करणा-या लोकप्रतिनिधींना निश्चितच न्याय देते. पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी करण्याबरोबरच शहराचा सांप्रदायायिक वारसा जपण्याचे काम आपण करू. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची ग्वाही महापौर राहुल जाधव यांनी दिली. 

One-way traffic plan in Hinjawadi gets nod from commuters

Over three lakh techies commute to Rajiv Gandhi Infotech Park in Hinjawadi on a daily basis and the traffic situation in the area is among the worst within the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) limits.

फेरीवाला जप्तीशुल्क निम्म्यावर

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कारवाईत जप्त केलेली हातगाडी, टपरी, वाहन व साहित्य परत करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी दंडाची रक्कम वाढविली होती. मात्र, आता जप्त केलेले साहित्य ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय बदलला आहे. दंडाची रक्कम निम्म्यावर आणली आहे. याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. 

कचरा रस्त्यावर टाकणार्‍या महिलेला शिकविला धडा

इसिए विभागप्रमुख सानप यांचे कर्तृत्व
सांगवी : पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये इकडे तिकडे रस्त्यावर, ओसाड ठिकाणी अजुनही कचरा टाकला जात आहे. महापालिका वारंवार कचरा रस्त्यावर टाकू नये म्हणून जनजागृती करताना दिसून येत आहे. मात्र त्याचा उपयोग होताना दिसून आहे. बाहेरील लोक येऊन उघड्यावर कचरा टाकून जातात. अनेकदा त्यांना कोणी रोख-ठोक करीत नाही. मात्र एका जागरूक नागरिकाने नुकताच एका महिलेला उघड्यावर कचरा टाकू नये म्हणून समज दिली. तसेच त्या महिलेला कचरा कुंडीतच कचरा टाकण्यासाठी प्रवृत्त करून त्या महिलेला कचरा कुंडीपर्यंत घेऊन गेले. हे जागरूक नागरिक म्हणजे इसिएचे ड क्षेत्रीय कार्यालय विभागाचे प्रमुख गोरक्षनाथ सानप आहेत. यांच्यासारखा जागरूकपणा प्रत्येक नागरिकाने दाखविल्यास शहर स्वच्छ राहण्यास नक्कीच मदत होईल. तसेच महापालिकेच्यावतीने करण्यात येणार्‍या जनजागृतीला यश आले असे म्हणता येईल.

मोशी कचरा डेपोत होणार ‘बायोमेडिकल वेस्ट’ प्रकल्प

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रुग्णालय व दवाखान्यामध्ये निर्माण होणारा जैववैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) व्यवस्थापन सुविधेचा अद्ययावत व उच्च क्षमतेचा प्रकल्प (सीबीएमडब्ल्यूटीएफ) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोत सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी 3 कोटी 75 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील जैववैद्यकीय कचरा प्रकल्पाची यंत्रणा जुनी झाली आहे. त्यामुळे नवा प्रकल्प उभारण्यात येत आहे.  

पिंपरी चिंचवड भाजपच्या उपाध्यक्षपदी दीपक मोढवे-पाटील

चौफेर न्यूज –  भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) उपाध्यक्षपदी दीपक मोढवे-पाटील यांची निवड करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते त्यांना नियुक्‍तीपत्र देण्यात आले. यावेळी महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, भाजपचे प्रवक्‍ते अमोल थोरात आदी उपस्थित होते.

गणेश मंडळांना बक्षिस वितरण करा, अन्यथा महापालिकेत ‘ढोल वादन’ आंदोलन – दत्ता साने

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी घेतलेल्या गणेशोत्सवातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या देखावा स्पर्धेचे बक्षीस वितरण अद्याप झालेले नाही. खडलेले बक्षीस वितरण दोन दिवसांत न केल्यास पालिका भवनात मंडळांतर्फे ढोल वादन आंदोलनाचा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला आहे.  

इंद्रायणी नदीकाठची गावठी दारू भट्टी जेसीबी लावून उध्वस्त

आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंबळी गावात इंद्रायणी नदीकाठी असलेली गावठी दारू बनविण्याची मोठी भट्टी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी लावून उध्वस्त केली. 1000 लिटर तयार दारू आणि 35 हजार लिटर दारू बनविण्याचे रसायन या वेळी नष्ट करण्यात आले.