पिंपरीः आशिया खंडात श्रीमंत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एखाद्या विकास प्रकल्पाची माहिती वा त्याबाबतचा माहितीपट वा लघुपट फेसबुक वा व्हॉटसअपवर आला, तर आता दचकू नका. कारण महापालिकेनेच आता त्यासाठी सोशल मिडियाची मदत घेण्याचे ठरविले आहे. त्याकरिता मे. कंसेप्ट कम्युनिकेशन्स लि. या माध्यम समन्वयक संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यापोटी या संस्थेला 25 लाख रुपये मोजले जाणार आहेत.

