MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 9 May 2020
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 30 कन्टेन्मेंट झोन
15 झोन झाले कमी : पाच दिवसांमध्ये 9 नव्या परिसरात “करोना’चा शिरकाव
दुकाने उघडण्यासाठी “कर’पावतीची अट रद्द
पिंपरी – तब्बल 45 दिवसांच्या लॉकडाऊननंतर तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाने अटी शिथील केल्यानंतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेने अडेलतट्टू भूमिका घेत कर भरण्याची अट टाकली होती. याबाबतचे वृत्त दैनिक प्रभातने आजच्या (शुक्रवार) अंकात प्रसिद्ध केली होते. त्यानंतर याबाबत स्थायी समितीमध्ये चर्चा झाली व ही जाचक अट रद्द करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे व शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी दिली.
“करोना’च्या साहित्य खरेदीसह 15 कोटींच्या खर्चास मंजुरी
स्थायी समिती सभा ः अन्य कामांनाही मिळाली मान्यता
थेरगावमधील रुग्णालयात कॅन्सरग्रस्तांवर उपचार सुरु करावेत -राहुल कलाटे
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव येथे उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील वैद्यकिय सुविधांचा विचार करुन या ठिकाणी तत्काळ कॅन्सर रुग्णालय सुरु करावे, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे. यामुळे शहरातील कॅन्सरच्या रुग्णांवर ईथेच उपचार होतील, असेही ते म्हणाले. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात […]
Big Breaking : पुण्यात केंद्रीय आरोग्य विभागाचं पथक दाखल; दिल्या महत्त्वाच्या सूचना
पुणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल झाले असून, या पथकाच्या सदस्यांनी आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासोबत याविषयी सविस्तर चर्चा केली.
चिंता वाढली : पुण्यात आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी आणि पगार कपात?
पुणे Coronavirus : गेल्या काही वर्षांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही शहरं आयटी हब म्हणून उदयाला आली. हिंजवडी, खराडी, वाकड, तळेगाव, मगरपट्टा सिटी, बाणेर, अशा परिसरात पुण्यातली आयटी इंडस्ट्री विखूरलेली आहे. प्रामुख्यानं विदेशातील प्रोजेक्ट्सवर अवलंबून असलेल्या या आयटी इंडस्ट्रिला कोरोना व्हायरस आणि त्यामुळं आलेल्या लॉकडाउनमुळं ब्रेक लागलाय.
परीक्षा फी अन् बॅकलाॅगचं काय होणार? विद्यार्थी गोंधळले!
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कही भरले आहे, त्यांना ते शुल्क परत मिळणार का?, तसेच ज्यांचे विषय बॅकलाॅग आहेत, त्यांच्या परीक्षा होणार का? याबाबत विद्यापीठाने खुलासा करून गोंधळ दूर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यात अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक खुले होणार; कधी ते वाचा सविस्तर
पुणे - लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्यामुळे बांधकामे सुरू होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील उद्योगही आता सुरू झाले आहेत. तसेच, आयटी देखील आता प्रत्यक्ष सुरू होण्याच्या मार्गावर आहे. येत्या चार दिवसांत या क्षेत्रांना गती मिळण्याची चिन्हे आहेत. वाहन दुरुस्ती, मोबाईल विक्री व दुरुस्ती, बांधकाम साहित्य आदींची दुकानेही काही प्रमाणात सुरू होत असल्यामुळे अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक खुले होऊ लागले आहे.
नवीन सदनिकांचा व्यवहार ऑनलाइन
पुणे - लॉकडाउनमुळे दस्त नोंदणी कार्यालये बंद आहेत. या पार्श्वभूमीवर नोंदणी व मुद्रांक विभागाने सदनिकांची दस्त नोंदणी ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधा फक्त नवीन सदनिकांसाठीच असणार आहे. जुन्या सदनिका आणि भूखंड यांच्यासाठी ऑनलाइन दस्त नोंदणीची सुविधा मिळणार नाही.
‘त्या’ तीन पिल्लांना वाचविण्यात अग्निशामक दलास यश
पिंपरी : सहा फूट अरूंद खोल खड्ड्यात पडलेल्या कुत्र्याच्या तीन पिलांना वाचविण्यात अग्निशामक दलास यश आले आहे. ही घटना वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील मौनीबाबा आश्रमाजवळ गुरूवारी (दि. ७) सायंकाळी घडली
स्थायी समितीच्या बैठकांवरून सत्ताधारी संशयाच्या भोवऱ्यात
पिंपरी, दि. 8 (प्रतिनिधी) – संपूर्ण राज्य आणि देश करोना विरोधातील लढाई लढत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना स्थायी समितीच्या बैठका घेण्याची घाई झाली आहे. कलम 144 लागू असताना व पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास अटकाव असतानाही स्थायी समितीने बैठकांची घाई चालविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार आयुक्तांना आर्थिक अधिकार प्राप्त झाल्यानंतरही स्थायी समितीने चालविलेला कारभार हा बेकायदा असल्याचीच चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)