पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 60 ते 70 हजार आणि पुणे शहरात एकूण दीड लाखांच्या आसपास केरळी बांधव राहतात. केरळी बांधवांचा येत्या शनिवारी (दि.25)ओणम हा मोठा सण आहे. तो साजरा न करता, ती रक्कम केरळच्या मदतीसाठी पाठविली जाणार आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेने केरळमधील पुरग्रस्तांना वाचविण्यसााठी 3 अद्ययावत बोटी पाठविल्या आहेत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 24 August 2018
केवळ खर्च वाया गेल्याची टिका होऊ नये म्हणून पालिकेकडून बीआरटीचा अट्टहास ?
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या नऊ वर्षे वेगवेगळ्या अडचणीमुळे रखडलेल्या बीआरटीएस मार्गावरून उद्या शुक्रवार पासून बस धावणार आहे. मात्र गेली नऊ वर्षात झालेल्या २७ कोटी खर्चावर टिका होऊ नये यासाठी बीआरटी मार्ग सुरु करण्याचा अट्टहास करण्यात आला आहे का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे एका अधिकाऱ्याने हे बोलून दाखवले.
निगडी-दापोडी बीआरटी आजपासून
पिंपरी - निगडी-दापोडी मार्गावरील बीआरटी बससेवा शुक्रवारपासून (ता. २४) सुरू होत असून, सुमारे एक लाखाहून अधिक प्रवाशांना जलदगतीने प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. निगडीपासून पुण्यातील बहुतेक सर्व प्रमुख भागांमध्ये प्रवाशांना बीआरटी बसमधून ये-जा करता येईल. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या हद्दीतील पाचवी बीआरटी सेवा सुरू होत असून, त्यावर एकूण ६२३ गाड्या धावणार आहेत.
पीएमपीच्या सव्वाशे बस रोज बंद पडतात
पुणे : देखभाल दुरुस्तीकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे, असा दावा पीएमपी प्रशासनाकडून केला जात असला, तरी गेल्या आठ दिवसांपासून दररोज सुमारे 125 हून अधिक बस बंद पडत आहेत. त्यात कंत्राटदारांच्या बसचे प्रमाण जास्त आहे. मात्र, त्यांच्याकडून पुरेशा उपाययोजना होत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल वाढले आहेत.
सांगवीतील जॉगींग ट्रॅकचे काम प्रगतीपथावर
जुनी सांगवी - जुनी सांगवी, नवी सांगवी येथील मध्यावर असलेल्या साई चौक ते माहेश्वरी (ईंद्रप्रस्थ) चौक या दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेकडुन येथील नाल्यावर उभारण्यात आलेल्या जॉगींग ट्रॅकचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. पी.डब्ल्यु.डी. मैदानाच्या शेजारी होत असलेल्या या जॉगींग ट्रॅकमुळे परिसरातील सकाळी व संध्याकाळी व्यायाम व फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणा-या नागरीकांसाठी उपयोगी ठरणार आहे.
[Video] अशी असेल शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रो (व्हिडिओ)
पुणे : जमिनीखालून 20 ते 28 मीटर खालून मेट्रोचा ट्युबच्या धर्तीवर दुहेरी भुयारी मार्ग साकारणार आहे. त्यासाठीच्या मशिनची किंमतच सुमारे 100 कोटी रुपये असेल ! भुयारी मार्गाचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होणार आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान भुयारी मार्गाने मेट्रो असणार आहे.
पुण्यात मेट्रो स्थानकांवरही "सायकल शेअरिंग'
पुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाच्या सर्वच म्हणजे 30 स्थानकांवरून प्रवाशांना माफक दरात भाडेतत्त्वावर "पब्लिक बायसिकल शेअरिंग' योजनेंतर्गत सायकली उपलब्ध होणार आहेत. याबाबतच्या महापालिकेच्या प्रस्तावाला महामेट्रोने नुकतीच मंजुरी दिली आहे.
शिवडी' फेम प्रियकराला महापालिकेकडून अभय?
पिंपरी : प्रेयसीची माफी मागण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल तीनशे जाहिरात फलक लावलेला प्रियकर शहरातील काही बड्या राजकीय नेत्यांचा नातेवाईक निघाला. राजकीय दबावामुळे त्याने पहिल्यांदाच असे कृत्य केल्याचे सांगत महापालिकेने कारवाई करण्यास चक्क नकार दिल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे.
पालिका प्रशासनाच्या ‘खाबूगिरी’मुळे स्मार्ट सिटी बकाल
वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे, पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असून पाणीटंचाई, वाढती गुन्हेगारी, निविदा प्रक्रियेत ‘रिंग’ आणि पालिका अधिकार्यांची ‘खाबूगिरी’मुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी बकाल झाली आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पालिका प्रशासनावर गुरुवारी (दि. 23) केला. मात्र, त्यांनी सत्ताधारी भाजपबद्दल एक शब्दही उच्चारला नाही
जलपर्णीचा होईल अनेक आजारांवर इलाज
आजकाल नदीतील पाण्यापेक्षा त्यावर जलपर्णी आच्छादलेली सर्वत्र दिसून येते. ज्या नदीतील पाणी दूषित तेथे जलपर्णीही मोठ्या प्रमाणात दिसते. जलपर्णी म्हणजे नदीतील पाण्याला झालेला रोग आहे, असे म्हटले जाते. पण हीच जलपर्णीतून अनेक रोगांवर औषध म्हणून वापरली जाऊ शकते, याबाबत हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागामध्ये प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील. प्रा. स्वप्ना पाटील यांचे संशोधन सुरू आहे.
गुंडांकडून तोडफोड सामान्यांसाठी डोकेदुखी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये आळंदी आणि चिखली पोलीस ठाण्यांचा नव्याने समावेश झाला आहे.
कचर्याच्या समस्या पथनाट्याद्वारे मांडल्या
महापालिकेच्यावतीने राबविला उपक्रम
चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन संस्थेने या प्रदर्शनात जनजागरण व प्रबोधन करण्यासाठी कचर्याचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरणाबाबत माहिती देण्यात आली. शहरातील कचर्याच्या विविध समस्या योग्य पद्धतीने व प्रभावी माध्यमातून समाजासमोर मांडण्यासाठी 30 पथनाट्ये शहरातील महाविद्यालयीन 460 विद्यार्थ्यांतर्फे सादर करण्यात आली. या प्रदर्शनास शहरातील जवळपास 8000 लोकांनी उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घेतला. प्रदर्शनास आलेल्या पाहुण्यांसाठभ पथनाट्य हा एक आकर्षणाचा विषय बनला होता.
लाईट नाही, बिले मात्र भरमसाठ
महावितरणचा भोंगळ कारभार
चिंचवड : पावसाळा सुरू झाल्यापासून या परिरात वीजेचा सातत्याने लपंडाव सुरू आहे. पाऊस सुरू झाला की, वीज जाते. वीजेच्या लपंडावाने नागरिक त्रासले आहेत. व्यवस्थित सेवा न देेणार्या महावितरण मात्र मोठ्या रकमेची वीज बिले नागरिकांना देत आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून महावितरणाच्या बिलामध्ये गडबड होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः चिंचवड परिसरात ही समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. केवळ रहिवासीच नव्हे तर व्यावसायिक वीज ग्राहकांनादेखील महावितरणाच्या कारभाराने त्रासून सोडले आहे. चिंचवडमधील अनेक ग्राहकांना अव्वाच्या-सव्वा विज बिले येत आहे. एक वर्षापासून 524 युनिट उद्योगनगर येथील क्वीन्सपार्क सोसायटीतील महिला ग्राहकांना सप्टेंबर 2017/ ऑगस्ट2018 एकासारखेच बिल येत आहे. दर महिन्याला वापरलेले युनिट 524 इतकेच येत आहे. संपूर्ण वर्षभरात एकदाही एकही युनिट वाढला नाही कि कमी झाला नाही. युनिट एक सारखे जरी असली तरी बिलाची रक्कम मात्र बदलत राहते.
पोलिसांची ‘संगीतखुर्ची’
पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा नियंत्रण कक्ष पिंपरी पोलिस ठाण्याच्या आवारात सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ७५ आहे. मात्र, त्यांना बसण्यासाठी केवळ १५ खुर्च्या उपलब्ध आहेत. त्यामुळे एक खुर्ची रिकामी झाली की त्यावर दुसऱ्याचा ‘डोळा’ असतो. संगीतखुर्चीचा हा खेळ आठवडाभरापासून सुरू आहे.
संस्कृतप्रेमी आयटीयन्सचा नाटकरूपी कलाविष्कार
पिंपरी - ते सर्व जण वेगवेगळ्या प्रांतांतील... कुणी पंजाबी, कुणी बंगाली... कुणी गुजराथी, कुणी राजस्थानी... कुणी बिहारी, कुणी पुणेरी... कुणी तेलगू तर कुणी केरळी... प्रत्येकाची भाषा वेगळी... संस्कृती वेगळी... पण, या संस्कृतीलाच हजारो वर्षांपासून एका धाग्यात घट्ट बांधून ठेवणाऱ्या संस्कृतच्या प्रेमापोटी ते एकत्र आले आणि संस्कृतचे अध्ययन सुरू झाले.
पाच चोरट्यांकडून चोरीच्या 20 दुचाकी हस्तगत
पिंपरी (पुणे) : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या पाच जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ लाख 55 हजारांच्या 20 दुचाकी हस्तगत केल्या. रामेश्वर विलास खंदारे (वय 25, रा. शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी), अनिल तबा काळे (वय 21, रा. भोसरमाळ, कन्हेर, पो. पोखरी ता. पारनेर, जि. अहमदनगर), अविनाश वामन मध्ये (वय 19, रा. म्हसोबाझाप, पो. पोखरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), ओंकार रमेश चव्हाण (वय 19, रा. भोसलेनगर, गोशाळेशेजारी, आळंदी, ता. खेड, जि. पुणे), रामेश्वर परमेश्वर भिसे (वय 21, रा. मरकळ, राजगुरुनगर बॅंकेच्या मागे, आळंदी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्राप्तिकर भरणात मोठी वाढ
नवी दिल्ली: गेल्या आर्थिक वर्षात प्राप्तिकराची वसुली विक्रमी झाली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) दिलेल्या माहितीनुसार 2017-18 या आर्थिक वर्षात प्राप्तिकराचा भरणा 10.03 लाख कोटी रुपये झाला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)