Tuesday, 27 November 2018

पिंपरी न्यायालयात संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज- संविधानामुळेच केवळ आपल्याला हक्क व अधिकार प्राप्त झाले. त्याआधारे आपण आपले जीवन जगले पाहिजे, असे मत अॅड. सतीश गोरडे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा करण्यात आला.

चिंचवडला भुयारी मार्गाचे नियोजन

पिंपरी - वाढती वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील चापेकर चौकात भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.

उद्योगनगरीतील साहित्यकला

महासाधू मोरया गोसावी यांचा वारसा पिंपरी-चिंचवडला लाभला आहे. पेशवेकाळात मनोहर लक्ष्मण पुराणिक नावाचे कवी चिंचवड येथे वास्तव्यास होते. त्यांनी प्राकृत अभंगरचना, श्‍लोक इत्यादी काव्यप्रकारांमध्ये विपुल लेखन केले; परंतु दुर्दैवाने कालौघात त्यापैकी बरेचसे नष्ट झाले.

वाहनाच्या आधुनिक इंडिकेटरचा शोध

पिंपरी - चिंचवड येथील अंकिता अशोक नगरकर आणि रत्ना पाटील या दोन मैत्रिणींनी वाहनांच्या आधुनिक इंडिकेटरचा शोध लावला आहे. वाहनाच्या छतावर बसविता येणाऱ्या या आधुनिक इंडिकेटरचे त्यांनी पेटंट नोंदविले आहे. अंकिताचे आतापर्यंतचे हे दहावे पेटंट आहे.

प्लॅस्टिकचा वापर सुरूच

पिंपरी - राज्य सरकारने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी जाहीर केली असली तरी शहरात अद्याप अनेक ठिकाणी या पिशव्यांचा वापर सुरू आहे. तो रोखण्यासाठी महापालिकेने ३२ पथके नेमली आहेत. त्यांच्या वतीने शहरात कारवाई सुरू असते. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आदी भागांतील भाजी मंडईंमध्ये काही विक्रेते सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करताना आढळतात. काही नागरिक अद्यापही बिनधास्तपणे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भाजी घेऊन जाताना दिसतात. प्लॅस्टिकच्या पिशव्या घेऊन जाताना महापालिकेच्या पथकाकडून पकडले गेल्यास कारवाई होऊ शकते, याची जाणीवही काहींना नाही. या संदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, ‘‘मंडईमध्ये महापालिकेची पथके पाठविण्यात येतील. पिशव्यांमध्ये भाजी देताना विक्रेता आढळल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.’’

डांगे चौकातून पुण्याकडे जाताना वाहतूक कोंडी

पिंपरी - रस्त्यालगत उभी असणारी वाहने, प्रवासी घेण्यासाठी थांबणाऱ्या रिक्षा अशा अनेक कारणांमुळे डांगे चौकातून पुण्याकडे जाणाऱ्या सेवारस्त्यावर वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडू लागली आहे. वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे सेवारस्त्यावरील वाहतूक अडचणीत सापडली आहे. 

उद्योगनगरी ते शिक्षणाची पंढरी

पिंपरी-चिंचवडची ‘औद्योगिकनगरी’ वाटचाल आता ‘शिक्षणाची पंढरी’कडे होत आहे. येथील विद्यार्थ्यांचा कला, साहित्य, सांस्कृतिकपाठोपाठ आता सायन्स, मॅनेजमेंट, टेक्‍नॉलॉजी, मायक्रोलॉजी, हॉस्पिटॅलिटी, सेफ्टी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे कल वाढला आहे. विद्यार्थ्यांना दिशा देणारे विविध कोचिंग क्‍लासेस....ई-स्कूल... व्हर्च्युअल क्‍लासरूममध्ये पारंपरिक शिक्षणाबरोबरच अपारंपरिक, व्यावसायिक, कौशल्यवृद्धीला चालना देणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या शिक्षणाची उत्तम सोय उपलब्ध झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते २०२० वर्षामध्ये पिंपरी-चिंचवड शहर हे ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळखले गेले, तर आश्‍चर्य वाटायला नको ! 

बालचित्रपट महोत्सवाची उत्साहात सांगता

पिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल आयोजित तीनदिवसीय बालचित्रपट महोत्सवाची रविवारी उत्साहात सांगता झाली. सुमारे तीन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या महोत्सवात सहभाग नोंदवला. 

होर्डिंग्जचा जाहीर लिलाव फायदेशीर

पिंपरी – शहराच्या काना-कोपऱ्यात आढळलेले 300 अनधिकृत होर्डींग्ज हटविण्यासाठी महापालिका साडे तीन कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यापेक्षा हे सर्व अनधिकृत होर्डींग्ज जप्त करुन, त्याचा लिलाव केल्यास महापालिकेचा खर्च वाचून, महापालिकेच्या उत्पन्नत वाढ होऊ शकता, अशी अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्‍त होत आहे.

प्राधिकरणाच्या जागेत संविधान भवन

पिंपरी – देशातील पहिले संविधान भवन औद्योगिकनरीत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोकळा भूखंड उपलब्ध करावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी प्राधिकरणाकडे केली आहे.

“त्यांच्या’ स्मृतीतून शहरात राष्ट्रीय खेळाडू घडतील!

पिंपरी – राष्ट्रीय खेळाडू कै. पै. मारुती (नाना) सहादू कंद यांनी कबड्‌डी या खेळात पिंपरी-चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे. मैदानांच्या नामकरणाच्या माध्यमातून दिवंगत खेळाडूंच्या स्मृती जतन करण्याच्या प्रयत्नामुळे जास्तीत-जास्त राष्ट्रीय खेळाडू या शहरातून निर्माण होतील, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

साकारली पवनामाईची विविध रुपे

पिंपरी – पवना जलमैत्री अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त जलदिंडी प्रतिष्ठान व भावसार व्हिजन पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथील दुर्गादेवी टेकडीवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

थेरगावातून सराईत गुन्हेगार जेरबंद

पिंपरी – भांडणे व मारामाऱ्यांसह अनेक गुन्हे असलेल्या तडीपार गुन्हेगाराला थेरगाव परिसरातून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुंडली पोर्टलवर!

पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुंडली आता सरकारने तयार केलेल्या खास पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बोगस कागदपत्रांच्या आधारे या अभ्यासक्रमाच्या पदव्या पदरात पाडून घेणाऱ्यांना चाप बसणार आहे. 

पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीतून होणार सुटका

राजगुरुनगर - पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट आणि नारायणगाव येथील साडेनऊ किलोमीटरच्या बाह्यवळण कामाची स्वतंत्र व अल्प मुदतीची निविदा शुक्रवारी प्रसिद्ध झाली. या कामासाठी ७५ कोटी रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मंजूर झाले आहेत, असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. 
दरम्यान, येत्या अडीच ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण होऊन खेड घाट आणि नारायणगावची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, असा दावाही त्यांनी केला.  

शहरातील रस्त्यांच्या कडेला राडारोडा

पिंपरी - शहरात एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना, दुसरीकडे रस्त्यांलगत व मोकळ्या जागांमध्ये राडारोडा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील काही मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही असे चित्र दिसत असून, ट्रॅक्‍टर, डंपर अशा वाहनांमधून राडारोडा टाकताना उडणाऱ्या धुळीचा पादचारी व दुचाकीस्वारांना सर्वाधिक त्रास होत आहे.

हातगाडी, टपऱ्यांचे अतिक्रमण

पिंपरी - शहरात पुरेसे रुंद प्रमुख रस्ते आणि प्रशस्त चौक असतानाही हातगाडी, टपऱ्यांमुळे वाहनचालकांना विविध अडथळ्यास तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यालगत होणाऱ्या पार्किंगची त्यात भर पडते. महापालिका, लोकप्रतिनिधी त्याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करत असून, शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. 

‘केपीओ’, ‘बीपीओ’त तुटपुंजे वेतन

पिंपरी - ‘‘माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी तीस टक्‍के लोक केपीओ (नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग) आणि बीपीओमध्ये (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) काम करतात. परंतु, त्यांना अत्यंत तुटपुंजे वेतन मिळते. कर्मचाऱ्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते,’’ अशी कैफियत फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजच्या (फाइट) पदाधिकाऱ्यांनी मांडली. 

नियोजन, तंत्रज्ञानाला महत्त्व

पिंपरी - ‘‘विकासकामांचे नियोजन करणे, नागरिकांच्या गरजेनुसार सोयीसुविधा पुरवणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे हे तीन घटक स्मार्ट सिटीत अंतर्भूत आहेत. सध्या या तीनही घटकांवर आधारित स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे,’’ अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. 

शहर पुनर्विकासासाठी ‘नागपूर पॅटर्न’

पिंपरी - ‘‘विकास आराखडे आखण्यापूर्वी अनियोजित पद्धतीने वसलेल्या शहरातील भागांचा नागपूर पॅटर्नप्रमाणे पुनर्विकास केला जाणार आहे,’’ अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. 

गुन्हेगारी टोळ्या पुन्हा “अॅक्टीव्ह’

पिंपरी – उद्योगनगरीत ज्याप्रमाणे उद्योग वाढत गेले तसेच गुन्हेगारीचे जग देखील वाढू लागले ते आता इतके वाढले आहेत की, शहरात गुन्हेगारी टोळ्या पुन्हा एकदा “अॅक्टीव्ह’ झाल्याचे मागील काही घटनांवरुन दिसून येत आहे. यामध्ये अल्पवयीनांचा सहभाग वाढत आहे. वर्चस्ववाद, आगामी निवडणुका, जुनी भांडणे यातून टोळ्या सक्रीय झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. “मेट्रो सिटी’ची पायाभरणी होत असताना गुन्हेगारी टोळ्यांचा वाढूू लागलेला उच्छाद चिंताजनक आहे.

समाजविकास अधिकाऱ्यांचे पंख छाटले

पिंपरी – महापालिकेचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्याकडून महिला व बालकल्याण योजना अंमलबजावणीचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. या योजना राबविण्याचे अधिकारी त्यांचे कनिष्ठ सहकारी सहसमाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने हा बदल करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी या आदेशात नमूद केले आहे. मात्र, ऐवलेंचे पंख छाटल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

“स्टेशन डायरी’चा “पेपरलेस’ कामकाजात अडसर

पिंपरी – स्टेशन डायरी हा पोलीस ठाण्याचा अविभाज्य भाग आहे. मात्र, “पेपरलेस’ कामकाजासाठी डायरी बंद करण्याचे आदेश 15 सप्टेंबर 2015 रोजी पोलीस महासंचालकांनी दिले होते. मात्र आजमितीलाही स्टेशन डायरीचाच वापर पोलिसांकडून होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी स्टेशन डायरी बंद करण्याचा आदेश काढला आहे. डायरी बंद करुन पोलीस ठाण्याचे कामकाज आता क्राइम ऍण्ड क्राईम ट्रॅकिंग नेटवर्क ऍण्ड सिस्टीम्स (सीसीटीएनएस) याद्वारे कामकाज करावे असे आदेशात म्हटले आहे.

“पासिंग टेस्ट’मध्ये सरासरी तीन टक्‍के वाहने “फेल’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत (आरटीओ) वाहनांच्या “फिटनेस टेस्ट’मध्ये सरासरी तीन टक्के वाहन “फेल’ झाली आहेत. 1 ते 31 ऑक्‍टोबर दरम्यान घेतलेल्या 3 हजार 68 वाहनांच्या तपासणीत ही बाब आढळली आहे.