Sunday, 24 February 2019

मेंदू तज्ञांच्या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी (दि. २३ फेब्रु.) :-   येथील डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज ॲंड हायटेक हॉस्पिटल आणि मिडवेस्ट चॅप्टर ऑफ़ न्युरोलॉजिकल सर्जन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यशाळेस मेंदू तज्ञांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.

19-year-old killed in an accident, truck set ablaze in Pimpri-Chinchwad

19-year-old killed in an accident, truck set ablaze in Pimpri-Chinchwad  Hindustan Times
A teenager was killed after a truck hit his two-wheeler, on an overbridge near KSB chowk, Pimpri-Chinchwad. The frenzied mob of people surrounding the spot ...

PCMC demolishes illegal temple after collapse of hall; contractor arrested

The civic body on Thursday demolished the unauthorized temple in Pimple Gurav and its contractor Rahul Jagtap was arrested, a day after four persons were killed after the slab of its illegal hall collapsed.

कायम परवान्यासाठी आरटीओचे आज, उद्या कामकाज सुरू राहणार

पुणे - शहरात सहा हजार नागरिक कायम परवान्याच्या (पर्मनंट लायसन्स) प्रतीक्षेत असून तो मिळण्यासाठी त्यांना पुढील तारीख उपलब्ध होत नाही. अशा उमेदवारांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) सुटीच्या दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे.

सावधान! आता पोलिसांकडे साडेसहा लाख गुन्हेगारांचा बायोमेट्रिक डेटा

पुणे : राज्याच्या कानाकोपऱ्यांतील गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी आणि गुन्ह्यांची तत्काळ उकल होण्यासाठी 'ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम' (ऍम्बिस) या संगणक प्रणालीद्वारे साडेसहा लाख गुन्हेगारांचा बायोमेट्रिक डेटा जमा करण्यात आला आहे.

पवना प्रदूषण; 5 व्यावसायिकांना दणका

पवना नदीपात्र दूषित केल्याप्रकरणी थेरगाव परिसरातील लॉन्ड्री व्यावसायिकांवर व इतर दोन छोट्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. प्रमाणापेक्षा जास्त केमिकल पाण्यात मिसळून नदी प्रदूषण तसेच, नदीतील मासे मृत झाल्याप्रकरणी तेथील सर्व लॉन्ड्री चालकांना व्यवसाय बंद करण्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस दिली आहे. अन्यथा, कारवाई करण्यात येईल, असे व्यावसायिकांना कळविण्यात आले आहे. ‘पुढारी’ ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अहवालानुसार कारवाई सुरू केली आहे.

‘आरटीओ’ने जपला ‘बॅलेन्सिंग पुणे पॅटर्न’

पुण्याबाहेरून अनेक वाहने पुणे शहरात आल्याचे आपण नेहमी पाहतो. पुण्यात किती वाहने येतात आणि जातात, याची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करण्यात येत असते. या माहितीनुसार 2018 या वर्षात तब्बल 40 हजार वाहनांनी पुणे एन्ट्री केली आहे. तसेच सुमारे 40 हजार वाहने पुण्याच्या बाहेर गेली आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयाने नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) वाटपाचा ‘बॅलेन्सिंग पुणे पॅटर्न’ जपला आहे. 

ओल्या कचऱ्यापासुन कम्पोस्ट खतनिर्मिती, नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपळे सौदागर (दि. २३ फेब्रु.) :-  येथील शिवम सोसायटीमध्ये अंतर्गत ओल्या कचऱ्यापासुन कम्पोस्ट खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे.  साधारण ६०० लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला कचरा संकलित करून, सोसायटी परिसरात उभारण्यात आलेल्या प्रकल्पात मशीनद्वारे खत निर्मिती करण्यात येते.

पवना धरणात ५ जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

पिंपरी (दि. २३ फेब्रु.) :- पाटबंधारे खात्याच्या सूचनेनंतरही महापालिकेने जास्तीचा पाणी उपसा सुरू ठेवल्याने पिंपरी-चिंचवडकरांना आता १० टक्‍क्‍यांऐवजी १८ टक्‍के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. पाणी कपातीचा निर्णय आणखी लांबल्यास कपात वाढवावी लागणार आहे.

PimpleSaudagar : प्रदुषणमुक्तसाठी पिंपळे सौदागर येथे लवकरच ई-स्कूटर सुविधा

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ‘पे अँड ड्राईव्ह स्कूटर’ सुविधा आठ ते दहा दिवसामध्ये सुरु होणार आहे. आज नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे लिप कंपनीच्या स्कूटरची नागरिकांनी राईड घेतली. 

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांच्या लढ्याला अखेर यश

एमपीसी न्यूज – शहर भाजपामध्ये जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असणारी नाराजी अखेर आज संपली. ओल्ड इज गोल्डच्या माध्यमांतून एकत्र आलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना उपाध्यक्षपदी निवड केली. 

Nigdi : स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान रंगणार

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील रसिक प्रेक्षक देखील सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध व्हावेत, त्यांनाही शास्त्रीय संगीताबरोबर सांस्कृतिक मैफल अनुभवता यावी या उद्देशाने पिंपरी-चिंचवड सोशल ट्रस्टच्या माध्यमातून स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती माहिती सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांनी दिली आहे. गुरुवार (दि.28) ते शनिवार (दि. 2 मार्च) या कालावधीत 

Pimpri: वृक्ष प्राधिकरण समितीच्या 28.67 कोटीच्या अर्थसंकल्पाला महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सन 2019-20 या आर्थिक वर्षातील 28.67 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला महासभेने मान्यता दिली. महाराष्ट्र नागरी क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन करणे अधिनियमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका वृक्ष संवर्धन विभागाने सन 2018-19 चे सुधारीत व सन 2019-20 चे मुळ 28 कोटी 67 लाख 16 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला स्थायी समितीची मान्यता 

Bhosari : स्मार्ट सिटीचा दर्जा उंचाविण्याचे काम असंघटित बांधकाम कामगार करताहेत – इरफान सय्यद (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरु आहेत. या स्मार्ट सिटीचा दर्जा उंचाविण्याचे काम असंघटित बांधकाम कामगार करत आहेत. कामगार सर्वांना घरे बांधून देत आहेत. इमारती बांधून देत आहेत. परंतु, याच कामगारांना हक्काचे घर नव्हते. कामगारांच्या हक्कांच्या घरांसाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले आहे.

Pimpri: स्मार्ट सिटीसाठी स्वीडनचे सहकार्य

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीमध्ये स्वीडनकडून सहकार्य करण्यात येणार असल्याचे स्वीडनच्या भारतातील कॉन्सुलेट जनरल श्रीमती उर्लिका संडबर्ग यांनी सांगितले. स्वीडनच्या पथकाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची गुरुवारी (दि.21) भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिका भवनात आलेल्या या शिष्टमंडळाचे आयुक्त हर्डीकर यांनी स्वागत केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर ‘या’ ८ जणांची वर्णी

पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीवर झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या पाच, राष्ट्रवादीच्या दोन आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाची निवड करण्यात आली. त्यामध्ये भाजपच्या आरती चोंधे, शितल शिंदे, संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे, झामाबाई बारणे या पाच नगरसेवकांचा तसेच राष्ट्रवादीच्या मयुर कलाटे, पंकज भालेकर या दोन नगरसेवकांचा आणि शिवसेनेच्या राहुल कलाटे या नगरसेवकाचा समावेश आहे.